जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना शपथ
औरंगाबाद, दि.
18 (जिमाका)-माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त (दि.20
ऑगस्ट) आज जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भवना शपथ घेण्यात आली. यावेळी माजी
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते
यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यांनी उपस्थित अधिकारी,
कर्मचारी यांना सद्भवना प्रतिज्ञा दिली. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सहायक
आयुक्त समाज कल्याण पांडुरंग वाबळे, तहसिलदार तेजस्विनी जाधव यांच्यासह
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राजीव गांधी यांची जयंती दि.20 ऑगस्ट रोजी असून
यासंदर्भात आज सद्भवना दिवस साजरा करण्यात यावा असे शासन परिपत्रकानूसार सूचित
केले होते.
Comments
Post a Comment