विशेष लेख योजना कल्याणकारी ….सर्वसामान्यांच्या दारी ‘शासन आपल्‍या दारी’ उपक्रमांतर्गत शासनाच्या 2 लक्ष 44 हजार 431 लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ

 




              

कल्‍याणकारी शासनाच्या  माध्‍यमातून राज्‍यातील सर्व नागरिकांच्‍या आर्थिक आणि सामाजिक कल्‍याण व सुरक्षेला प्राधान्‍य देण्‍यात आहे. शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्‍यांची  अमंलबजावणी गतीमान करण्‍यासाठी ‘शासन आपल्‍या दारी’ ह्या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यतील कन्नड झाला.

या अभियानामध्‍ये विविध विभागानी योजनेचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करुन दिला. या विषयी विभागनिहाय लाभाची माहिती.

 

१.महसुल विभाग

·         संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय  वृध्‍दापकाळ योजनाख्‍ श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍तीवेन योजनांचे एकुण २८२७ लाभार्थ्‍यांना  प्रतीमाह १०००/- या प्रमाणे २८ लाख २७ हजार रुपयांचे अनुदान मंजुर करण्यात आले.

·         मतदार नोंदणी झालेले -५५२८ मतदारांना निवडणूक मतदान कार्ड वाटप करण्‍यात येत आहे.

·         विविध प्रकारच्‍या प्रमाणपत्रामध्‍ये  जात प्रमाणपत्र, रहिवासी , उत्‍पन्‍न, इडब्‍यु एस प्रमाणपत्र असे एकूण 1 लक्ष 1 हजार 706  प्रमाणपत्राचे वाटप

·         सौर ऊर्जा केंद्र प्रकल्‍पासाठी १८ ठिकाणी २९१ हेक्‍टर जमीनीचे वाटप

·         राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना -75

·         भार संचार निगम यांना डिजीटल इंडियासाठी 12 ठिकाणी 2400 चौ जमीन वाटप

 

२. ग्रामविकास विभाग

·         ग्रामविकास विभागामार्फंत MSRLM मध्‍ये राबविल्‍या जाणा-या सर्व योजनासाठी १०४६४ लाभार्थ्‍यांना १३४ कोटी २५ लक्ष रुपयांचा लाभ मंजूर करण्‍यात येत आहे.

·         MSRLM/NRLM-

·         उमेद २१२ बचत गटांन बँक अर्थसहाय्य  रक्‍कम  रुपये ०४ कोटी ३८ लक्ष कर्ज वाटप करण्‍यात येत आहे.

·         मुद्रा कर्ज स्‍वयंसहायता समुहातील १५३ महिलांना ०१ कोटी १४ लक्ष रुपयांचे वितरण करण्‍यात आलेले आहे.

·         आरोग्‍य विभाग जिल्‍हा परिषद अंतर्गत-

·         प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत ८५९३ लाभार्थी यांना प्रती ५०००/- प्रमाणे ४ कोटी ३० लक्ष रुपये लाभ देण्‍यात आलेला आहे.

·         जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ८७०६ लाभार्थी यांना एकूण ६१ लक्ष रुपयांचा लाभ देण्‍यात  आलेला आहे.

·         कृषी विभाग जिल्‍हा परिषद अंतर्गत-

·          डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्‍वावलंबन योजनेअंतर्गत ११८ लाभार्थ्‍यांना  ०२ कोटी २० लक्ष रुपयांचा आर्थिक सहाय्य मंजूर करण्‍यात आलेले  असून ३७७ लाभार्थी यांना मंजूरी प्रदान करण्‍यात आलेली आहे.

·         समाज कल्‍याण विभाग जिल्‍हा परिषद अंतर्गत-

·         शालेय शिक्षण विभागामार्फत  २५ हजार ५०१ विद्यार्थ्‍यांना  १ कोटी २५ लक्ष शिष्‍यवृत्‍ती  वितरीत करण्‍यात येत आहे.

·         महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद अंतर्गत -

·         महिला व बालविकास विभाग अंतर्गत महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद औरंगाबद अंतर्गत एकुण 268 लाभार्थ्यांना 13 लक्ष 48 हजार लाभ देण्यात येत आहे.

3. कृषी विभाग-

·         कृषी विभागाअंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प ( पोकरा) योजनेमध्ये एकुण 31 हजार 154 लाभार्थ्यांना विविध लाभामध्ये 231 कोटी 71 लक्ष, महाडिबीटी अंतर्गत कृषी यांत्रीकीकरण, सुक्ष्म सिंचन, फलोत्पादन योजनेअंतर्गत एकुण 21 हजार 009 लाभार्थ्यांना 91 कोटी 15 लक्ष, राज्यपुरस्क्त एकात्मीक कापुस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेंअतर्गत 11 हजार 291 लाभार्थ्यांना 01 कोटी 76 लक्ष, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 441 लाभार्थ्यांना फळबाग लागवडीसाठी 01 कोटी 45 लक्ष, कोरडवाहु क्षेत्र विकास कार्यक्रम (RAD) योजनेअंतर्गत 179 लाभार्थ्यांना 49 लक्ष 44 हजार, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत 103 लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी 2 लक्ष याप्रमाणे 02 कोटी 06 लक्ष, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत 07 लाभार्थ्यांना 11 कोटी 09 लक्ष रुपयांचे आर्थीक मदत / अनुदान मंजुर करण्यात येत आहे.

·         सन 2022-23 या आर्थिक वर्षात 549 नविन शेतकरी उत्पादक कंपन्या कंपनी कायद्याखाली नोंदणीकृत झालेल्या आहेत तर 461 नविन शेतकरी गट आत्मा अंतर्गत नोंदणीकृत झाल्या आहेत.

·         अशा रितीने कृषी विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनासाठी 64 हजार 184 लाभार्थ्यांना 339 कोटी 73 लक्ष 12 हजार पाचशे अठ्याहत्तर रुपयांचा लाभ / रकमेचे वाटप करण्यात आला आहे.

4. नगर विकास विभाग

·         प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 हजार 155 लाभार्थ्यांना 25 कोटी 25 लक्ष, प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत 2 हजार 665 लाभार्थ्यांना 01 कोटी 50 लक्ष, (Skill Development (NULM) कौशल्यविकास योजनेअंतर्गत 470 लाभार्थ्याना 30 लक्ष, बचत गटासाठी आर्थीक मदत म्हणुन 03 कोटी, नगरपालीकेच्या स्वनिधीतुन 137 दिव्यांगासाठी 30 लक्ष रुपये रुपयांचे आर्थीक मदत / अनुदान मंजुर करण्यात येत आहे.

·         नगर विकास विभागांतर्गत एकुण 11 हजार 814 लाभार्थ्यांना 29 कोटी 35 लक्ष रुपयांचे आर्थीक मदत/ अनुदान मंजुर करण्यात येत आहे.

5. कामगार विभाग-

·         कामगार विभागाअंतर्गत 3001 कामगारांसाठी अत्यावश्यक संच व सुरक्षा संच देण्यात येत आहे.

·         अत्यावश्यक संचामध्ये मच्छरदानी, चटई, जेवणाचा डब्बा, बॅटरी, बॅग, पाण्याची बॉटल, पेटी, असे प्रती संच 4579/- रुपयेकिमंतीचे अत्यावश्यक संच व सेफटीबेल्ट, हेलमेट, शुज, जॅकेट, हँडग्लोज, मास्क, हेअर बँड असे 4661/- रुपये किमंतीचे सुरक्षा संच देण्यात येत आहे.

·         3001 लाभार्थ्यांसाठी प्रती लाभार्थी 9240/- रु प्रमाणे एकुण 02 कोटी 77 लक्ष, किमंतीचे साहित्य कामगारांना पुरविण्यात येत आहे.

6. आदिवासी विकास विभाग-

·         एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनाअंतर्गत रसवंती मशीन घेण्यासाठी 12, पिठ गिरणी घेण्यासाठी 08, मिनी दालमिल - 05 तसेच न्युक्लीअस बजेट योजनाअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना तारकुंपन करण्यासाठी 25 लाभार्थ्यांना व 40 वर्षाच्या आतील आदिवासी विधवा महिलांना विविध व्यवसाय करण्यासाठी ( लोखंडी स्टॉल सह) - 26 लाभार्थ्यांना मिळुन एकुण 76 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य पुरविण्यात आले.

·         पारधी विकास योजना अंतर्गत पारधी समाजातील लाभार्थ्यांना शेळी पालन योजनांमध्ये 16 लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. MCDE कार्यालयातून सोलार (PV) जुळणी व दुरुस्तीचे प्रात्याक्षीक प्रशीक्षण योजनेचे प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना सरावासाठी टुलकिट खरेदी करीता 04 लाभार्थ्यांना अर्थसहाय पुरविण्यात येत आहे. पारधी समाजातील लाभार्थ्यांना MCDE कार्यालयातुन (दुचाकी वाहण) जुळणी व दुरुस्तीचे प्रात्याक्षीक प्रशीक्षण योजनेचे प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना सरावासाठी टुलकिट खरेदी करीता 09 लाभार्थ्यांना अर्थसहाय पुरविण्यात येत आहे. पारधी समाजातील लाभार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी योजनांमध्ये 02 लाभार्थ्यांची निवड करुन अर्थसहाय पुरविण्यात येत आहे.

·         विशेष केंद्रिय सहाय योजनांअतर्गत अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना Tubewell and Pumpset साठी 10 व अनुसुचित जमातीच्या महिला बचत गटांना पोल्ट्री फार्म बांधकाम व प्रशीक्षणासाठी 03 महिला बचत गटांना प्रती बचत गट 10 लक्ष प्रमाणे 30 लक्ष रुपयांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे.

7. सैनिक कल्याण विभाग -

·         सैनिक कल्याण विभागाअंतर्गत श्री नवल भाऊसाहेब भाऊराव, दफादार यांना सैन्यात सेवा करीत असतांना त्यांनी केलेल्या विशेष कार्यामुळे त्यांना दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी मेन्शन - इन-डिस्पॅच पदक देऊन गौरविण्यात आले त्या अनुषंगाने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत एकरकमी रक्कम रुपये 6 लक्ष आर्थीक मदत मंजुर करण्यात आलेली आहे.

·         सैनिक कल्याण विभागाअंतर्गत श्री करपे राजाभाऊ दगडुबा गणर हे सैनिक सेवेतुन सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना कसल्याही प्रकारची शासकिय / निमशासकिय नौकरी न मिळाल्यामुळे सैनिक कल्याण विभाग / महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण मंडळ यांच्या नियमावलीनुसार स्वंयरोजगार अंतर्गत परिवहन वाहन खरेदी करीता घेतलेल्या कर्जावर रक्कम रुपये 03 लक्ष रुपयांचे आर्थीक अनुदान मंजुर करण्यात आले आहे.

·         अशा रितीने 2 लाभार्थ्यांसाठी एकुण 09 लक्ष रुपयांचे आर्थीक मदत / अनुदान मंजुर करण्यात येत आहे.

8. वन विभाग -

·         वन विभागाअंतर्गत वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिक व पशुधन नुकसान भरपाई तसेच ईको डेव्हलपमेंट समिती उपयोगी साहित्यांचे एकुण 74 लाभार्थ्यांसाठी 688495/- अक्षरी सहा लक्ष अठयाऐंशी हजार चारशे पंचान्नव रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

9. सहकार विभाग-

·         सहकार विभागाअंतर्गत राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचनेत (STCCS) 117 विविध कार्यकारी सहकारी संस्थांना सक्षमिकरणासाठी सन 2018-2019 या वर्षाचे अनुदान मागणी प्रकरणे मंजुरी वर्ष 2022 2023 अंतर्गत रक्कम रुपये 5157087/- अक्षरी एकावन्न लक्ष सत्तावण्ण हजार सत्याऐंशी रुपये इतक्या रकमेचे आर्थीक सहाय्य देण्यात येत आहे.

10. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग-

·         अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील सुधारीत आकृतीबंधानुसार औरंगाबाद जिल्हयात नव्याने निर्मीत लिपीक व टंकलेखक (गट- ) संवर्गातील एकुण 06 पदांची अनुकंपा भरती करण्यात आलेली आहे. प्रातीनिधीक स्वरुपात 06 व्यक्तीपैकी श्री अमितशेरोन अविनाश बडोने (खुला प्रवर्ग) व श्री शेख शकीलुधिन सलिमोधिन (खुला प्रवर्ग) यांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे.

·         सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत- 1031, कुटूंबाना प्राधान्य कुटूंब योजनेत समावेश करण्यात येत असुन त्यांना प्रती महा प्रती लाभार्थी 03 किलो गहु व 02 किलो तांदुळ या प्रमाणे 05 किलो शीधावस्तु वितरीत करण्यात येणार आहे.

·          NPH योजनेअंतर्गत 127 कुटूंबांचा समावेश करण्यात येत आहे.

11. अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळ

·         अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळ अंतर्गत 179 लाभार्थ्यांना 16 कोटी रुपयांचे अर्थसहाय मंजुर करण्यात येत आहे.

12. उद्योग विभाग -

·         उद्योग विभागामार्फत जिल्हा कार्यालयाअंतर्गत 07 लाभार्थ्यांना 13 लक्ष् 20 हजार रुपयांचे आर्थीक मदत / अनुदान वितरीत करण्यात येत आहे.

13. महिला व बालविकास विभाग

·         जिल्हा महिला व बालविकास अधीकारी औरंगाबाद यांच्यामार्फत 100 लाभार्थ्यांना 09 लक्ष रुपयांचे लाभ देण्यात येत आहे

14. कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता विभाग-

·         कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता विभागाअंतर्गत बदलत्या आधुनिक गरजानुसार रोजगार निर्मीती साठी स्वंयरोजगार उपलब्ध व्हावा. रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी व कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातुन रोजगार प्राप्ती व्हावी. रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये विविध विभागामधून 2 लक्ष 44 हजार 431 लाभर्थ्यांना लाभ घेतला असुन सर्व सामान्य नागरिकांना योजनांची माहिती त्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्राची उपलब्धता सहज शक्य झाली. शासन आपल्या दारी या अभियानातुन जिल्हा प्रशासनाने शासनास लोकाभिमूख करुन नागरिकांना केंद्रस्थानी ठेवले आहे. सर्व विभागाच्या समन्व्यातून शासन सर्व सामान्यांच्या दारी लाभाची संधी घेऊन गेले आहे. मा.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यभरात मोठ्या प्रमाणात जनसामान्यांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत आहे.

डॉ.मीरा ढास

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद

 

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा