महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा2023 गणेशोत्सव मंडळांना सहभागाचे आवाहन; 15 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

 


औरंगाबाद, दि.11(जिमाका)-  सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट्सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेत राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी आपले अर्ज  mahotsav.plda@gmail.com  या इमेल पत्त्यावर दि.15 पर्यंत  पाठवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊन निवड झालेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना  राज्यस्तरीय पारितोषिक याप्रमाणे- प्रथम पारितोषिक पाच लाख रुपये, द्वितीय पारितोषिक अडीच लाख रुपये, तृतीय पारितोषिक एक लाख रुपये.

जिल्हास्तरावरील विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सर्व नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळे  अथवा संस्था सहभागी होऊ शकतील. स्पर्धेची माहिती व अर्ज  https://pldeshpandekalaacademy.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  मंडळांनी आपला भरलेला पूर्ण अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल पत्त्यावर दि.15 सप्टेंबर पर्यंत पाठवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

स्पर्धेतील सहभागी मंडळांचे परीक्षण व गुणांकन करण्यासाठी खालीलप्रमाणे समित्या तयार करण्यात आल्या आहेत.

जिल्हास्तरीय  समिती - अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी, सदस्य- प्रत्येक उपक्षेत्रातील पोलीस उपअधिक्षक, सहा.पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी, विभागप्रमुख Department Of Fine Arts, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोगय् अधिकारी, सदस्य सचिव जिल्हा नियोजन अधिकारी .

जिल्हास्तरीय समिती जिल्हा कार्यक्षेत्रातील तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची राज्य समितीकडे अनुषंगिक कागदपत्रे, व्हिडीओसह शिफारास करेल.

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रीय निवड समिती

अध्यक्ष सहायक आयुक्त (सांस्कृतिक), ..पा. औरंगाबाद, सदस्य् संबंधित क्षेत्रातील पोलीस उपअधिक्षक, सहा.पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी,आरोग्य अधिकारी, अधिष्ठाता शासकीय कला अभिकल्प महाविद्यालय, उपप्रादेशिक अधिकारी (औरंगाबाद), महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळ, सदस्य् सचिव सांस्कृतिक अधिकारी (सांस्कृतिक विभाग), औरंगाबाद ..पा.

औरंगाबाद ग्रामीण क्षेत्र- तालुकास्तरीय निवड समित्या

अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, सह अध्यक्ष तहसिलदार, सदस्य उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्रतिनिधी, शासकीय अनुदानित कला महाविद्यालय, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सदस्य सचिव गट विकास अधिकारी.

जिल्हास्तरीय समन्वय समितीची कार्यकक्षा

जिल्हा माहिती कार्यालयाशी समन्वायाने योजनेबाबत आवश्यकतेनुसार प्रचार प्रसिद्धी करणे. पु..देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडून जिल्ह्यतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज संबंधित निवड समितीस  संदर्भिय शासन निर्णयानुसार अभिप्रायसह गुणांकन करणेकरीता उपलब्ध करुन देणे. निवड समित्यांचे अहवालांनुसार प्रति निवडसमिती 01 असे  जिल्ह्याकरीता एकूण 03 गणेशोत्सव मंडळांची पुरस्काराकरीता व्हिडीओग्राफी कागदपत्रांसह राज्यस्तर समितीकडे शिफारस करणे. वेळोवेळी शासन निर्देशानुसार योजनेच्या प्रभावी अंमलबजाणदृष्टीने कामकाजात समन्वय संनियंत्रणाचे दृष्टीने आवश्यक कार्यवाही करणे.

निवड समित्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्राप्त झालेले अर्जाचे संदर्भिय शासन निर्णयानुसार अभिप्रायासह गुणांकन करुन आवश्यक कार्यवाही करण्यासाठी उत्सवस्थळी भेट, मंडळाकडून व्हिडीओग्राफी, अनुषंगिक कागदपत्रे . आधारे गुणांकन करावे. अभिप्रायासह गुणांकन निश्चित करुन जिल्हास्तरीय समितीस अहवाल सादर करणे निवडसमिती कार्यक्षेत्रातील गुणानुक्रमानुसार पहिल्या तीन  गणेशोत्सव  मंडाळाची  निवडीकरीता जिल्हास्तर समितीकडे शिफारस (व्हिडीओग्राफी कागदपत्रांसह ) शिफारस करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  निर्गमित केले आहेत.

000000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा