सावित्रईबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव दि.30 पर्यंत सादर करण्याचे आवाहन
औरंगाबाद,
दि. 15 (जिमाका)- समाज कल्याण
विभागामार्फत मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (इ. 5 वी ते 7 वी व 10 वी ते 10 वी) विविध घटकांना दिली जाते.
ह्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळानिहाय ऑफलाईन पद्धतीने पंचायत समितीस्तरावर दि.30
पर्यंत सादर करावे,असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले आहे.
सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये मॅट्रिकपुर्व
शिष्यवृत्ती योजना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (इ. 5 वी ते 7 वी व 10 वी ते 10 वी),
गुणवत्ता शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती
(इ. 1 ली ते 10 वी) इयत्ता 1 ते 10 वी मधील विजाभज व इमाव प्रवर्गातील
मुला मुलींना मॅट्रीक पुर्ण शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी (इ. 10 वी) योजना
मागील वर्षाप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व
माध्यमिक मान्यताप्राप्त शाळांनी शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीनेच
सादर करावे. जिल्ह्याचे प्रस्ताव तयार करण्याबाबत सर्व यापुर्वीच कळविण्यात आले
आहे.
ग्रामीण
भागातील शाळांनी त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर आयोजित कार्यशाळेत
(कार्यशाळा कालावधी दि. 27 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावयाचे
आहे. तरी शहरी भागातील शाळांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा
परिषद औरंगाबाद कार्यालयाचा सध्याचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय
भवन शासकीय दुध डेअरीच्या पाठीमागे, शिवाजी हायस्कुलच्या बाजुची इमारत, खोकडपुरा,
औरंगाबाद येथे दि. 30
सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावयाचे आहे,असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment