राष्ट्रीय लोक अदालत; 3317 प्रकरणांमध्ये तडजोड

 


औरंगाबाद, दि. 11 (जिमाका) –जिल्हा विधि सेवा प्राधिकरण औरंगाबाद व जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे शनिवार दि.9 रोजी आयोजित लोक अदालतीत 2 हजार 470 प्रलंबित व 847 दाखलपुर्व असे एकुण 3317 प्रकरणांमध्ये  तडजोड झाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली प्रशांत फडणीस यांनी दिली आहे.

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, विद्युत चोरी, धनादेश अनादर प्रकरणे, कौटुंबिक, भुसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. वादपुर्व प्रकरणामध्ये युनियन बॅंक ऑफ इंडिया,स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, महाराष्ट्र बॅंक, महाराषट्र ग्रामिण बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक, युको बॅंक,एस.बी.आय.क्रेडीट, आय.सी.आय.सी.आय.बॅंक, यवतमाळ अर्बन, टी.व्ही.एस.क्रेडीट, टाटा मोटार्स, आर्यानंदी नंदीनी फायनान्स, जॉन डिअर फायनान्स, हिंदुजा फायनान्स, उज्जीवन स्मॉल फायनान्स,बी.एस.एन.एल, व्होडाफोन, बजाज फायनान्स, एल अॅण्ड टी फायनान्स, महापारेषण, एच.डी.एफ.सी. बॅंक, बजाज अॅटो फायनान्स,धनी लोन्स फायनान्स,एच.डी.बी.फायनान्स,एडीलेव्हीस हाऊसिंग फायनान्स,श्रीराम सिटी फायनान्स युनियन,चोलामंडल फायनान्स,भारत संचार निगम, वोडाफोन, आय.सी.आय.सी.आय. बॅंक, अॅक्सीस बॅंक, एच.डी.एफ.सी.बॅंक, टी.व्ही.एस.क्रेडीट सव्र्हिसेस लि., आणि मध्यस्थी केंद्रामधील वादपुर्व प्रकरणे आणि मध्यस्थी केंद्रामधील वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.

प्रलंबित प्रकरणांमध्ये एकुण रक्कम रू. 83 कोटी 08 लक्ष 19 हजार 534 रुपये व वादपुर्व प्रकरणांमध्ये एकुण रक्कम 5कोटी 18 लक्ष 57 हजार 512रुपये  इतकी अशी एकुण 88 कोटी 26लक्ष 77 हजार 046/- रुपये रक्कम तडजोडीने सोडविण्यात आली, माहिती सचिव श्रीमती वैशाली प्रशांत फडणीस यांनी दिली.

लोकअदालतीमध्ये एकूण 15 पॅनल करण्यात आले होते त्यावर न्यायाधीश एन.एम.,  एन.एस.मोमीन, ए.आर.उबाळे, एस.एम.आगरकर, आर.एस.भाकरे, डी.जी.मालविया, सी.पी.काशीद, वाय.पी.पुजारी, श्रीमती यु.एम. वैद्य, श्रीमती एम.एम.माळी, ए.बी.मुसळे,एस.एम.बोहरा,एस.एल.रामटेके, श्रीमती ए.एस दरड, श्रीमती ए.आर.देवरे यांनी पॅनल प्रमुख म्हणुन व तर विधिज्ञांनी  पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच श्रीमती व्ही.आर. हंगरगेकर, श्रीमती एस.एस.रामदीन, जी.डी.गुरुनुळे यांनीही आपला सहभाग नोंदवला.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा