मतदार नोंदणी प्रशिक्षणात 57 अधिकाऱ्यांचा सहभाग
औरंगाबाद, दि. 6 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरक्षिण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त् कार्यालय व विभागीय मुख्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी, विभागीय निहाय प्रशिक्षक, अधिकारी यांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणात 57 अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील एकूण 57 महसूल विभागातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते झाले. उपायुक्त जगदीश मिनीयार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके तसेच विभागातील अन्य निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
मतदार नोंदणी प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात
आले. यामध्ये सहा सत्रात मार्गदर्शन करण्यात आले.
त्यात शरद महाडिक, दयानंद जगताप, सोहम वायळ, सुशांत शिंदे, संजय पाटील या
साधन व्यक्तिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अखेरच्या सत्रात गट चर्चा होऊन नंतर
चाचणीही घेण्यात आली.
00000
Comments
Post a Comment