महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (दि.9) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी परीक्षा
औरंगाबाद, दि. 4
(जिमाका) – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
यांचे मार्फत शनिवार दि.9 रोजी औरंगाबाद जिल्हाकेंद्रावर दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर
व न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग परीक्षा – 2022 या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा
सकाळी 10 ते 12 या वेळेत 12 उपकेंद्रावर होणार असून या परीक्षेसाठी एकूण 3 हजार
816 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे. परीक्षेसाठी एकूण 403 अधिकारी कर्मचारी यांची
नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे
यांनी दिली आहे.
परीक्षेसंदर्भात
संघ लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या सुचनाः-
परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांने प्रवेशपत्र
व स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट,
पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड या प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतेही एक ओळखपत्र
व त्यांची छायांकीत प्रत सोबत आणावी. परीक्षा कक्षामध्ये पेपर सुरु होण्याच्या एक तास
अगोदर प्रवेश देण्यात येईल. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या शाईचे
बॉल पॉईंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत, मास्क, पारदर्शक सॅनिटायझर बॉटल
या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास परवानगी
नाही.
उमेदवारांना डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेराफोन
किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षात नेण्यास सक्त
मनाई आहे. असे साहित्य सोबत आणल्यास उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या
आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची
असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास
उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरीता बंदी
घालण्यात येईल. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच परीक्षेच्या दिवशी उमेदवाराची
तपासणी पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. व महिला उमेदवारांकरीता महिला पोलिसांमार्फत
तपासणी करण्यात येईल. आयोगाकडून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे वितरीत करण्यात
आलेले प्रवेश प्रमाणपत्र हे त्यांच्यासाठी प्रवेशाचा पास म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
तसेच परीक्षेसाठी स्वतंत्र ई-पास अथवा इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता असणार नाही.
तथापि, प्रवेश प्रमाणपत्रासोबत उमेदवाराने ओळखीच्या पुराव्याकरीता आधारकार्ड, पॅनकार्ड,
पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र अथवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी
कोणतेही एक जवळ बाळगणे व तसे तपासणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य राहिल, असे जिल्हा
पर्यवेक्षकीय समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रभोदय गोविंद
मुळे यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment