महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.निलिमा सरप व डॉ.गोविंद काळे यांचा दौरा कार्यक्रम

 


औरंगाबाद, दि.1 (जिमाका)-  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ.निलिमा सरप (लखाडे) व पा्र.डॉ.गोविंद काळे हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरीता 10 सप्टेंबर  ते 12 सप्टेंबर या कालावधीत बीड आणि औरंगाबाद जिल्ह्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात विविध जातीच्या संदर्भात क्षेत्र पाहणी करणार असुन दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

दि.10 सप्टेंबर 2023 सायं 6 वा. खासगी वाहनाने बीड येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. दि.11 सप्टेंबर 2023 सकाळी 9 वा. बीडहून माजलगावकडे रवाना. सकाळी साडे दहा वाजता शासकीय विश्रामगृह माजलगाव येथे आगमन. सकाळी 11 वा. माजलगाव येथील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधीशी चर्चा व क्षेत्रपाहणी (जायकोची वाडी, धर्मेवाडी). दुपारी 1 वा. माजलगावाहून गेवराई जि.बीडकडे रवाना. दुपारी अडीच वाजता शासकीय विश्रामगृह, गेवराई जि.बीड येथे आगमन व भोजन. दुपारी 3 ते 4 विविध जातसमुहांच्या प्रितिनिधी, संघटनाशी चर्चा व निवेदने स्विकारणे. दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत गेवराई, जि.बीड येथील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधीशी चर्चा व क्षेत्रपाहणी (पाडळशिंगी, जिरेवाडी) सायंकाळी साडेसहा वाजता गेवराई, जि.बीड येथून पैठण, जि.औरंगाबाद कडे रवाना. सायंकाळी साडेसात वाजता शासकीय विश्रामगृह पैठण, जि.औरंगाबद येथे आगमन व मुक्काम.

दि.12 सप्टेंबर सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत तहसिल कार्यालय पैठण येथे वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधीशी चर्चा. सकळी साडेदहा ते साडेअकारा पैठण येथील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधीशी चर्चा व क्षेत्रपाहणी (सोनवाडी, नानेगाव, एकतुनी व भोकरवाडी). सकाळी साडेअकरा वाजता शासकीय विश्रामगृह औरंगाबाद कडे रवाना. दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथे आगमन. दुपारी 12 ते 1 विविध जातसमुहांच्या प्रतिनिधी संघटनाशी चर्चा व निवेदने स्विकारणे. दुपारी 1 ते 2 राखीव. दुपारी अडीच ते साडेतीन औरंगाबाद मधील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक व चर्चा. सायंकाळी 4 ते 6 उपसंचालक (शिक्षण), औरंगाबाद विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद यांचेसोबत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती बाबत आढावा बैठक. शिक्षणधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जि.प. औरंगाबाद यांच्यासोबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संवर्गाच्या इतर मागासवर्ग बिंदुनामावली व जिल्हा बदलीबाबत बैठक व चर्चा. सहायक आयुक्त (मावक), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांचेसोबत बिंदुनामावली बाबत बैठक व चर्चा. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यांच्याशी बैठक व चर्चा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृह, औरंगाबाद)

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा