सैन्यदलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण

 


औरंगाबाद, दि. 11 (जिमाका) – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना भरती पूर्व तयारी करण्यासाठी छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत SSB कोर्स क्र.54 आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या  प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात येते.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कार्यालय, औरंगाबाद येथे दि.28 सप्टेंबर रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB54 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा Whatsapp No. 9156073306 या मोबाईल नंबर वर SSB54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करुन दिले जाईल. शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेऊन यावेत.

कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CBSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरेने एस एस बी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी.मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एस एस बी कॉल लेटर असावे किंवा एस एस बी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी-अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 व भ्रमणध्वनी क्र.9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, औरंगाबाद यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा