गव्हाच्या साठ्यावर निर्बंध

 


औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) – केंद्रशासनाच्या  दि.12 जून 2023 च्या अधिसुचनेमध्ये घाऊक व्यापारी,किरकोळ व्यापारी, बिग चेन रिटेलर्स व प्रोसेसर्स करीता गव्हाच्या साठ्यावर दि.31 मार्च 2024 पर्यंत निर्बंध लागू केले आहेत.

घाऊक व्यापारी 3000 टन, किरकोळ व्यापारी प्रत्येक आऊटलेटसाठी 10 टन, बिन चेन रिटेलर्स प्रत्येक आउटलेटसाठी 10 टन व डेपोसाठी 3000 टन व वार्षिक स्थापति क्षमतेच्या 75 % किंवा मासिक स्थापति क्षमता गुणिले सन 2023-24 चे उर्वरित महिने यापैकी जे कमी असेल ते

 व्यापारी यांच्याकडे असणारा गव्हाचा साठा दि.12 जून 2023 च्या अधिसुचनेतील साठा निर्बधापेक्षा जास्त असल्यास तसे https://evegoils.nic.in/wsp.login या संकेतस्थळावर अधिसुचनेच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत गव्हाचा साठा कमी करणे आवश्यक राहील.

केंद्र शासनाच्या पोर्टलवर गव्हाचा साठा नियमितपणे प्रकट करण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे.

            जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी बिग चेन रिटेलर्स व प्रोसेसर्स यांनी https://evegoils.nic.in/wsp.login या संकेतस्थळावर विहीत मुदतीत प्रकट करण्यात यावा. तद्नंतर याच संकेत स्थळावर दर शुक्रवारी साठा बाबतची माहिती नोंद करणे आवश्यक, अनिवार्य आहे.

            जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यतील सर्व संबंधित आस्थापनांना कळविण्यात येते की, त्यांच्या कडील गव्हाचा साठा (दर शुक्रवारी) उपभोक्ता मामले विभागाच्या https://evegoils.nic.in/wsp.login या संकेतस्थळावर नोंदणी करुन अपलोड करावा.

            शासनाने ठरवुन दिलेल्या निर्बंधापेक्षा गव्हाचा साठा जास्त आढळून आल्यास, व साठेबाजी करणाऱ्या संबंधित आस्थापना, व्यापारा विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा