मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद येथे आगमन व स्वागत
औरंगाबाद, दि.16 (जिमाका) - राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम
दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले.
यावेळी विमानतळावरील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी अभिवादन
केले. तसेच सुवासिनींनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केले. पालकमंत्री संदिपान भुमरे, पणनमंत्री
अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी
आस्तिक कुमार पांडेय यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
00000





Comments
Post a Comment