केंद्र शासन पुरस्कृत सखी निवास योजना

 


औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) -   नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता केंद्र शासनाच्या दि.14.जुलै 2022 रोजीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत संबल आणि सामर्थ्य या दोन योजना राबविण्यात येत आहेत.

योजनेतील सामर्थ्य या उपयोजनेत नोकरी करणाऱ्या महिलांकरीता सखी निवास या घटक योजनेचा समावेश आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्हयात 1. सखी निवास कार्यान्वीत करावयाचे आहे.

जिल्हयातील नोकरी करणा-या महिलांना नोकरीच्या शहरामध्ये सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी औरंगाबाद जिल्हयासाठी 1 सखी निवास मंजुर आहे. भाडेतत्वावरील इमारतीमध्ये सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार पात्र संस्था,एजन्सी कडून यापूर्वी प्रस्ताव मागविण्यात आले होते परंतु कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे परत एकदा इच्छाकांकडून प्रस्ताव विहित पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती केंद्र शासनाचे दि.14.जुलै 2022 रोजी मिशन शक्ती या एकछत्रीत योजनेचे मार्गदर्शक सूचना, प्रस्ताव सादर करावयाच्या अर्जाचा नमुना, अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण पध्दत, संस्था,एजन्सीच्या पात्रतेचे निकष, सखी निवासासाठी आवश्यक असलेली इमारत व भौतिक सोयीसुविधा, अनुदान, कर्मचारी वर्ग, शासन निर्णय सर्व सविस्तर माहिती महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे https: //www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

औरंगाबाद जिल्हयात केंद्र शासन पुरस्कृत सखी निवास योजना कार्यान्वीत करुन ती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाचे शासन निर्णय व या संबंधीचे वेळोवेळी निर्गमीत होणाऱ्या सुचनेनूसार सदरची योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था,एजन्सिज कडून याद्वारे दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी कार्यालय, औरंगाबाद प्लॉट नं. 9 जाधव यांची इमारात, खोकडपुरा, औरंगाबाद दुरध्वनी क्रमांक 0240-2325068 संपर्क साधावा.असे जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा