डाक विभागात जीवन विमा एंजट पदासाठी अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.21 (जिमाका) – डाक विभागात जीवन विमा, ग्रामीण जीवन विमा एजंटांच्या नेमणूका थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहेत.

पात्रतेचे निकष याप्रमाणे- वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष, किमान 10 वी उत्तीर्ण अथवा केंद्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष, सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार, इतर विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते, स्वंयरोजगारास इच्छुक. व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विम्या बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इ. बाबी आवश्यक. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक असेल ही रक्कम राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तात्पूरता परवाना देण्यात येईल. त्यानंतर आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर परवाना कायम स्वरूपाच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल.

इच्छुकांनी जालना प्रधान डाकघर, जालना – 431 203 येथे जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यांसाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्राची एक साक्षांकीत प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकारच्या छायाचित्र तसेच पुढील नमुन्यातील अर्जासह सोमवार दि.25 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्वावर असेल,असे प्रवर अधीक्षक डाकघर छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा