एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात फळबागांचे पुनरुज्जीवन शेतकरी बांधवानी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत

 


छत्रपती संभाजीनगर,दि.26 (जिमाका) – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2023-24 मध्ये जुना फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canpoy) इ.बाबीमुळे उत्पादकता कमी होत आहे.

नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही राज्याची फळपिकांची एकूण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची बाब आहे.2023-24 मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कू या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रु.40 हजार प्रति हेक्टर ग्राह्या धरुन त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त रक्कम रु. 20 हजार प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी 0.20 हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकानिहाय बागांचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.

फळपिकांचे नाव

फळपिकाचे वय (वर्ष)

कमीत-कमी वय

जास्तीत-जास्त वय

1

आंबा

20

50

2

चिकू

25

50

3

संत्रा

10

25

4

मोसंबी

8

25

           

सर्व शेतकऱ्यांना जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा