खुलताबाद उरुस; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सुचना

 


औरंगाबाद, दि.6 (जिमाका) – खुलताबाद येथे दि.21 ते 29 या कालावधीत येथील जर जरी बक्ष उर्स महोस्तव होणार आहे. या कालावधीत नैसर्गित अथवा मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणामार्फत जनहिताच्या व खबरदारीच्या मार्गदर्शक सुचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन विधाते यांनी  जारी केल्या आहेत.

मार्गदर्शक सुचनाः-

नागरिकांनी अफवा पसरवू नये व त्यावर विश्वास ठेऊ नये. अधिकृत प्राधिकरणाकडून, अधिकाऱ्यांकडून नागरी उद्घोषणा पद्धतीद्वारे अथवा भिंतीफलक किंवा आराखड्यातील सूचनांचे पालन करावे.

आणीबाणी प्रसंगी मदत करणाऱ्या यंत्रणाचे दूरध्वनी क्रमांक तोंडपाठ करावीत (उदा.100,101,108 इ.)

जमावाचा प्रवाह ज्या दिशेला जात आहे त्याचा विरुद्ध दिशेला जाण्याचा प्रयत्न करु नका. पोलीस, अग्निशमन दल आणि आणीबाणी वैद्यकीय सेवा यांना सहकार्य करा.विकलांग व्यक्ती, गरोदर महिला, वृद्ध आणि लहान मुलांना मदत करण्याचा प्रयत्न करा.

कार्यक्रमाच्या स्थळाचा मांडणी आराखडा, आणीबाणी प्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग समजून घ्यावेत.

जर आपण खाली पडला असाल तर त्वरीत उठून उभे राहण्याचा प्रयत्न करावा. जर जखमी झाल्यामुळे तुम्हाला उठणे शक्य होत नसेल तर इतरांची मदत द्या.

जर तुम्ही जमिनीवर पडला असाल व तुम्हाला कोणाचाही मदत प्राप्त झाली नाही तर जमावाच्या प्रवाहाच्या दिशेने रांगण्याचा प्रयत्न करा व पुढे जाऊन उभे राहण्याचा प्रयत्न करा.

 आपणास जमावाचा प्रवाह धक्काबुक्की करुन पुढे नेण्याचा प्रयत्न करेल अशा वेळेस भिंती, लोखंडी बॅरकेटस यांच्यावर तुम्ही आदळणार नाही याची दक्षता घ्या. अपघात झालेल्या ठिकाणी जाण्याचे टाळा.

तुमच्या सोबत असलेल्या परंतु संपर्क होऊ न शकलेल्या व्यक्तीची माहिती पोलीसांना द्या.

आपण ज्या ठिकाणी उभे आहात तेथील जमीन असमान असल्यास, पाण्यामुळे घसरडी झाली असल्यास दक्षता घ्या कारण अशा ठिकाणावरुन तुमचा पाय घसरुन दुखापत होऊ शकते.

 मोकळी जागा हे सुरक्षित ठिकाण असल्यामुळे बाहेर पडताक्षणी मोकळ्या ठिकाणी पोचण्याकरीता विविध मार्गांनी जाण्याचा प्रयत्न करा.

नारळ, तेल, नैवेद्य नेमून दिलेल्या ठिकाणीच अर्पित करावे.

आपल्या सोबत आलेल्या सर्व लहान मुले व वृद्ध व्यक्ती यांच्या खिशात संपर्क क्रमांक असलेली चिट्टी द्यावी जेणेकरुन आपत्ती प्रसंगी संपर्क प्रस्थापित करणे शक्य होईल.

यासर्व सुचना या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी व आपत्ती स्वतःचा बचाव करण्यात उपयुक्त ठराव्या यासाठी देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे,  असेही निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी आवाहन केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा