आरोग्य विभागाची आयुष्मान भव मोहिम
औरंगाबाद,
दि. 11 (जिमाका)
–आरोग्य तपासणी करुन आरोग्य कार्ड वाटप करण्यासाठी जिल्ह्यात ‘आयुष्मान भव मोहिम’ राबविण्यात
येत आहे. ही दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत राबविण्यात येणार असून . या मोहिमे अंतर्गत
जनसामान्यांसाठी एकाच छत्रा खाली विविध आरोग्य योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी
दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत आजतागायत आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात येत
आहे. या उपक्रमाचा लाभ सर्व सामान्या पर्यंत पोहचेल यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी
करुन कार्ड वाटप करण्यात येणार आहे.
गावपातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता
ग्रामपंचायत व ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती यांच्या मार्फत आयुष्मान सभा घेण्यात येईल. आयुष्मान
कार्ड व आभा कार्ड वाटप करण्यात येणार आहे. आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य
रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग इ.बाबत जनजागृती तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर
मिळणाऱ्या सेवा सुविधांचे मुल्यमान करण्यात येईल.
आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवडयातील शनिवार
पुढील विषयांनुसार उपक्रम प्राध्यान्याने राबविण्यात येतील.
आठवडा 1: एनसीडी स्क्रीनिंग ( मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, तोंड
गर्भाशय, ग्रीवा आणि स्तनकर्क रोग)
आठवडा2: क्षयरोग, कुष्ठरोग आणि संसर्गजन्य
रोग
आठवडा3 : माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि
लसीकरण
आठवडा4: नेत्ररोग तपासणी आणि नेत्र निगा
सेवा (आदिवसी क्षेत्र-सिकलसेल रोग तपासणी)
सर्वसमावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य,
वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्रा, कान, नाक व घसा यांचे
आरोग्य समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सलटेशन
सेवा देण्यात येणार आहेत.ग्रामीण रुग्णालयस्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या साहय्याने
तज्ञ सेवा पासुन वंचित रुग्णांना तज्ञांची सेवा पुरविण्यात येतील.
अंगणवाडी व शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी
सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळामधील मुलांसाठी
विशेष मोहिम राबवुन 0-18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जन्मजात
विकृती शारिरीक, मानसिक विकास, कुपोषण व 32 प्रकारच्या आजाराची तपासणी व उपचार करण्यात
येईल. आवश्यकतेनुसार सहायक उपकरणे व शस्त्रक्रियेसाठी संदर्भसेवा देण्यात येईल. आरोग्य
संस्थाची स्वच्छता, रक्तदान शिबीरे व अवयवदान बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. दि.13
सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या योजनेचे उद्घाटन करणार आहेत, असे जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment