ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान: प्रकल्प संचालक डॉ.राजाराम दिघे यांची भेट
छत्रपती संभाजीनगर, दि.21(जिमाका)-स्टरलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड (STL) व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या संयुक्त भागीदारीतून जिल्ह्यातील 21 ग्राम पंचायतीमधील 36 गावांमध्ये जल शक्ती अभियानच्या धर्तीवर महाराष्ट्र ग्राम करण्याचे काम सुरु आहे. प्रकल्प संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी या प्रकल्पातील विविध गावांना भेट देऊन पाहणी केली.
त्यांचेसमवेत
अभियान व्यवस्थापक दिलीपसिंग बयास, विस्तार अधिकारी विजयकुमार पंडित यांनी छत्रपती
संभाजीनगर येथील ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन, छावणी परिषद, सामाजिक वनीकरण स्टरलाईट
टेक्नॉलाजी लिमिटेड, महानगरपालिका यांच्या संयुक्त भागीदारीतून खामनदी येथील घनदाट
वृक्ष लागवडची पाहणी केली. तिसगाव, गांधेली गावतील सरपंच, ग्राम विकास अधिकारी पी.आर.रिंढे,
ए.आर.गायकवाड व गावकरी यांच्याशी पाणी, शेती, रोजगार, घरकुल, महिला बचत गट, शाळा, अंगणवाडी,
आरोग्य सेविका, PHC ई.विषयावर चर्चा करण्यात आली.
प्रकल्पामध्ये
प्रामख्याने समुदाय संस्थाचे बळकटीकरण, गाव स्तरावरील पाण्याची सुरक्षितता आणि शाश्वतता,
जल संधारण पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, जुन्या जल संरचनाचे पुनर्जिवन करणे, घनदाट
वनीकरण,पाणलोट विकास, विहीर व बोअर वेल पुनर्भरण व जल साक्षरता निर्माण करुन पाण्याच्या
कार्यक्षम वापरास प्रोत्साहान देऊन जल सक्षम गावे व अटल आनंद घनवन धर्तीवर घनवन पद्धतीने
वृक्ष लागवडीचे मोठे काम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चालू आहे. प्रथम वर्षात 1 लक्ष
69 हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यावर्षी 2 लक्ष 28 हजार वृक्ष लागवड करण्यात
येत आहे. गारखेडा येथील जिल्हा परिषेदला शाळेला भेट देऊन बालभारती सहावीत सावित्रीबाई
फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान कामाची पाहणी केली. विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली.
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षण, व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी
जिल्हा कार्यकारी विठ्ठल घोगरे, प्रकल्प समन्वयक सतीश खंदारे, जलदुत बाळू कोळगे, महेश
तळेकर रविंद्र वाघमोडे, अमोल कुटे आदी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment