कन्नड येथे बुधवारी (दि.11) आमसभा
छत्रपती संभाजीनगर,दि.10 (जिमाका)- कन्नड तालुक्याची आमसभा बुधवार दि.11
रोजी सकाळी 10 वा. होणार आहे, अशी माहिती सचिव तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती कन्नड
यांनी दिली आहे.
विधानसभा सदस्य आ. उदयसिंग राजपूत हे या
आमसभेच्या अध्यक्षस्थानी राहणार असून
गजानन हेरीटेज, कन्नड येथे ही सभा होणार आहे. तालुक्यात सन 2023-24 या
वर्षातील विकास कामे तसेच आगामी सन 2024-25 या वर्षात करावयाच्या विकास कामांचे
नियोजन याबाबतचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे, असे गटविकास अधिकारी यांनी कळविले
आहे.
00000
Comments
Post a Comment