गंगापूर येथे सोमवारी (दि.16) आमसभा

 


छत्रपती संभाजीनगर,दि.10 (जिमाका)- गंगापूर तालुक्याची आमसभा सोमवार दि.16 रोजी सकाळी 10 वा. होणार आहे, अशी माहिती सचिव तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर यांनी दिली आहे.

विधानसभा सदस्य आ. प्रशांत बंब हे या आमसभेच्या अध्यक्षस्थानी राहणार असून  शिवकृपा मंगल कार्यालय, तहसिल कार्यालयासमोर वैजापूर रोड, गंगापूर येथे ही सभा होणार आहे. तालुक्यात सन 2023-24 या वर्षातील विकास कामे तसेच आगामी सन 2024-25 या वर्षात करावयाच्या विकास कामांचे नियोजन याबाबतचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे, असे गटविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा