ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी
छत्रपती संभाजीनगर, दि.3 (जिमाका) – जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त
प्रादेशिक उपायुक्त विभाग, सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण विभाग छत्रपती
संभाजीनगर यांच्या वतीने त्रिंबकराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित ज्येष्ठ
नागरिक महिला गृह वाहेगाव येथे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात
आला. यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांची
आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे तसेच फळे, भोजन देण्यात आले. सहभागी
झालेल्या सर्व वृद्ध महिलांचा सन्मान करण्यात आला. जेष्ठ नागरिकांसाठी निवारा गृहात गरम पाण्याची सोय, वॉशिंग
मशीन उपलब्ध करुन त्याचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी प्रादेशिक उपायुक्त जयश्री
सोनकवडे, सहायक आयुक्त राजमोड यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वैशाली कळासरे गृहपाल मुलींचे
वस्तीगृह गंगापूर यांनी वृद्ध महिलांची आरोग्य तपासणी केली. बेबी दांडगे समाज
कल्याण निरीक्षक यांनी प्रास्ताविक तर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
00000

Comments
Post a Comment