आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर, दि. 10 (जिमाका)- जिल्ह्यामध्ये दि. 16 ते 30 पर्यंत राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विषयक
विविध प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम शाळा, महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले
आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच राष्त्रीय
छात्रसेना (NCC) व इतर विद्यार्थी सहभागी होतील,असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जनार्दन विधाते यांनी
कळविले आहे.
प्रशिक्षणाची वेळ व दिनांक याप्रमाणे-
सोमवार दि.16 रोजी सकाळी 10 ते 3 दगडोजीराव
देशमुख महाविद्यालय, वाळुज, मंगळवार दि. 17 रोजी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय,
सोयगाव, बुधवार दि. 18 रोजी छत्रपती माध्यमिक विद्यालय, सिल्लोड, गुरुवार दि. 19 रोजी मुक्तानंद कॉलेज, तहसील कार्यालय शेजारी,
गंगापुर, शुक्रवार दि. 20 रोजी विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापुर, शनिवार दि. 21 रोजी
शिवाजी आर्टस, सायन्स कॉलेज, कन्नड, सोमवार दि. 23 रोजी घृष्णेश्वर माध्यमिक व उच्च
माध्यमिक महाविद्यालय, खुलताबाद, बुधवार दि. 25 रोजी कन्या विद्यालय, पैठण, गुरुवार
दि. 26 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,
न.प. समोर फुलंब्री, शुक्रवार दि. 27 रोजी डी. के.एम.एम कॉलेज,बेगमपुरा छत्रपती
संभाजीनगर. ही सर्व प्रशिक्षणे सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळात होणार आहेत, असेही निवासी
उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
जनार्दन विधाते यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment