नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा; नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१९)महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर,दि.१८(जिमाका):- नवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यात १० ठिकाणी ‘नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा’, या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.१९ रोजी करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ
रंगमंदिर येथे सायं.४ ते ६ या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या
कार्यक्रमात सहभागाचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे व जिल्हाधिकारी
आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक
कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान
सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन होत आहे.
राज्यात दि.१८ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत राज्यातील ६ महसुली विभागीय
आयुक्तालयाच्या ठिकाणी (मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागूपर)
तसेच साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर,वणी) हा
कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि.१९ रोजी संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती
संभाजीनगर येथे सायं.४ ते ६ या वेळेत ‘नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा’ हा
कार्यक्रम होणार आहे. रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल
सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधान परिषद
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लोकसभा सदस्य खासदार सय्यद इम्तीयाज जलिल, विधानपरिषद
सदस्य आ.सतिश चव्हाण, आ.विक्रम काळे, विधानसभा सदस्य आ.हरिभाऊ बागडे, आ.संजय
शिरसाठ आदी मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.
तरी रसिक प्रेक्षकांनी ‘नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा’ या सांस्कृतिक
कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या या
कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सांस्कृतिक
कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे व जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले
आहे.
०००००

Comments
Post a Comment