जिल्ह्यातील १७ प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन; सर्व केंद्रांवर युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कौशल्यातून रोजगार मिळवा- आ. हरिभाऊ बागडे
छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका):- प्रशिक्षणातून
कौशल्य विकास आणि कौशल्य विकासातून रोजगार मिळवा,असे आवाहन आ. हरिभाऊ बागडे यांनी
आज वडोद बाजार ता. फुलंब्री येथे केले.
ग्रामीण भागातील युवकांकरीता ग्रामपंचायत
स्तरावर ५११ प्रधानमंत्री उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या केंद्रांचे उद्घाटन झाले.
जिल्ह्यातील १७ केंद्रांचा यात समावेश आहे. आज जिल्ह्यात वडगाव कोल्हाटी, पंढरपूर ता. छत्रपती संभाजीनगर,
रांजणगाव शेनपुंजी, हर्सूल सावंगी, पिशोर,
देवगाव रंगारी ता.कन्नड,बिडकीन, विहामांडवा ता.पैठण,वडोदबाजार, गणोरी ता. फुलंब्री, वेरुळ ता.खुलताबाद, अजंठा, घाटनांद्रा ता.सिल्लोड,
फर्दापूर, गोंदेगाव ता.सोयगाव, शिवूर, लासुरगाव ता. वैजापूर या केंद्रांचे उद्घाटन
करण्यात आले.
वडोद बाजार
येथील कार्यक्रमास आ. हरिभाऊ बागडे यांच्या सह अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद
लोखंडे, सरपंच पाकीजा पठाण, अनुराधा
चव्हाण, ऐश्वर्या गाडेकर, शिवराम मस्के आदी उपस्थित होते.याप्रसंगी ग्रामस्थ,
विद्यार्थी, युवक युवतींची संख्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कौशल्य विकास प्रशिक्षण
प्रधानमंत्री
उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांमध्ये जनरल ड्युटी असिस्टंट, फ्लेबोटोमिस्ट, फिटर,
फॅब्रिकेशन, मल्टी स्किल टेक्निशियन (इलेक्ट्रीकल), ग्राफिक डिझायनर, फिल्ड
टेक्निशियन, इतर घरगुती उपकरणे, दुचाकी सेवा तंत्रज्ञ, डेअरी शेतकरी, उद्योजक,
सोलर पीव्ही इंस्ट्रॉलर(सूर्यमित्र), डेटा एन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक इ. रोजगार/ स्वयंरोजगाराभिमुख
अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संस्थांमार्फत राबविणार प्रशिक्षण
महाराष्ट्र
राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई कार्यालयामार्फत स्वारस्याची अभिव्यक्ती (EOI)
प्रक्रिया पूर्ण करुन गठीत समितीमार्फत तीन संस्थामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण
राबविले जाणार आहे. त्या संस्था याप्रमाणे-
छत्रपती संभाजीनगर, गंगापूर या तालुक्यांमधील गावांकरीता उज्वलयोग इंडिया
ओपीसी प्रा. लि. (संपर्क व्यक्ती- योगेश धोत्रे, मोबाईल क्रमांक ९८६०१०५६१७),
कन्नड, पैठण आणि फुलंब्री या तालुक्यांमधील गावांकरीता श्री राजुरेश्वर गणेश
बहुउद्देशीय संस्था (संपर्क व्यक्ती- नरेंद्र अमृतकर, मोबाईल क्रमांअक ८४१२९९५७५७)
आणि खुलताबाद, सिल्लोड सोयगाव व वैजापूर तालुक्यांमधील गावांकरीता युवा विकास
सोसायटी (संपर्क व्यक्ती- रामेश्वर मोरे, मोबाईल क्रमांक ९०२१७२९३७२)
ग्रामिण
भागातील १८ ते ४५ वयोगटातील इच्छुक युवक युवतींनी या प्रशिक्षणासाठी आपला सहभाग
नोंदवावा. गुरुवार दि.१९ रोजी दुपारी ४ वा. जवळच्या प्रशिक्षण स्थळी उपस्थित
रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती
संभाजीनगर सुरेश वराडे यांनी केले आहे.
केंद्रनिहाय उद्घाटन सोहळा
वडगाव कोल्हाटी
ता. छत्रपती संभाजीनगर येथील केंद्र गजानन हॉस्पिटल, हायटेक कॉलेज समोर, महाराणा
प्रताप चौक येथे आहे. उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय रासे लक्ष
ॲकेडमी , महाविर चौक एमआयडीसी वाळूज रोड, पंढरपूर येथे करण्यात आली होती. सरपंच
सुनिल काळे, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे अनिल तुपसुंदर, कौशल्य
विकास विभागाचे अमोल मोकल, शासकीय आयटीआयचे पी.आर.पाटील उपस्थित होते.
पंढरपूर ता.
छत्रपती संभाजीनगर येथील केंद्र रासे लक्ष ॲकेडमी , महाविर चौक एमआयडीसी वाळूज
रोड, पंढरपूर येथे असून तेथेच उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय
करण्यात आली. सरपंच वैशाली बाळासाहेब राऊत, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास
केंद्राचे विजय अहेर, कौशल्य विकास विभागाचे अमोल मोकल, शासकीय आयटीआयचे के.एस.गाडेकर उपस्थित होते.
रांजणगाव
शेणपुंजी ता. गंगापूर येथील केंद्र ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आहे. उद्घाटन
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, शिवनेरी कॉलनी
येथे करण्यात आली होती. सरपंच योगिता महालकर, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास
केंद्राचे प्रमोद पानसरे, कौशल्य विकास विभागाचे अमोल मोकल, शासकीय आयटीआयचे सुंदर
गेनूजी लांडे उपस्थित होते.
हर्सूल सावंगी
येथील केंद्र मेन रोड हर्सूल सावंगी येथे असून तेथेच उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय
करण्यात आली होती. सरपंच मीनाताई संजय पांडव, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास
केंद्राचे वाल्मिक जगताप, कौशल्य विकास विभागाचे अमोल मोकल, शासकीय आयटीआयचे योगेश
प्रधान उपस्थित होते.
पिशोर ता.
कन्नड येथील केंद्र घर क्रमांक ३७९, पिशोर ता.कन्नड येथे आहे. उद्घाटन सोहळ्याचे
थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय माळी समाज मंगल कार्यालय, पिशोर येथे करण्यात आली
होती. सरपंच डहाके ताई, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे चेतन
अमृतकर, कौशल्य विकास विभागाचे नागेश मिटकरी, शासकीय आयटीआयचे शेख सर उपस्थित होते.
देवगाव रंगारी
ता. कन्नड येथील केंद्र अध्यक्ष जलशुद्धीकरण केंद्र, गट नं. ३३५, देवगाव रंगारी येथे आहे. उद्घाटन
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय सावता माळी समाज मंगल कार्यालय, देवगाव रंगारी
येथे करण्यात आली होती. सरपंच गोकुळ गोरे, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास
केंद्राच्या हर्षदा येवले, कौशल्य विकास विभागाचे नागेश मिटकरी, शासकीय आयटीआयचे
टी.आर. भोपे उपस्थित होते.
बिडकीन ता. पैठण येथील केंद्र घर क्रमांक ४२९, बिडकीन ता.पैठण येथे आहे.
उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय श्री कृष्णा मंगल कार्यालय, येथे करण्यात
आली. या वेळी तहसीलदार सारंग चव्हाण, श्रीमती गायकवाड ग.वि.आ. पंचायत समिती पैठण,
सुरेश वराडे, सहायक आयुक्त कौशल्य विकास, एन. आर. खौसे, गटनिदेशक योगेश जोशी,
विभाग समन्वयक मंत्री कार्यालय, नागेश मिटकरी, कौशल्य विकास समन्वयक, श्री
राजुरेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे चेतन अमृतकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे
शिल्प निदेशक, तालुक्यातील 18 ते 45 वयोगटातील युवक युवती आदी उपस्थित होते.
विहामांडवा ता.
पैठण येथील केंद्र घर क्रमांक ३७८, विहामांडवा ता.पैठण येथे आहे. उद्घाटन
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय तांबे मंगल कार्यालय, विहामांडवा येथे
करण्यात आली होती. सरपंच मनिषा येळे, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास
केंद्राचे नरेंद्र अमृतकर, कौशल्य विकास विभागाचे डॉ. अनिल जाधव, शासकीय आयटीआयचे
आर. टी. ठोंबरे उपस्थित होते.
वडोद बाजार
ता. फुलंब्री येथील केंद्र घर क्रमांक १३०७
, वडोद बाजार ता.फुलंब्री येथे आहे. उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची
सोय ग्रामपंचायत धर्मशाळेसमोर, वडोद बाजार येथे करण्यात आली होती. सरपंच साबिर
भाई, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे श्रीनिवास कुलकर्णी, कौशल्य
विकास विभागाचे डॉ. अनिल जाधव, शासकीय आयटीआयचे एन.आर. सोनुने उपस्थित होते.
गणोरी ता. फुलंब्री येथील केंद्र सर्व्हे नं.६७, गणोरी
ता.फुलंब्री येथे आहे. उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय पूजा लॉन्स,
गणोरी येथे करण्यात आली होती. सरपंच संतोष तांदळे, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य
विकास केंद्राचे सारंग बगाड, कौशल्य विकास विभागाचे डॉ. अनिल जाधव, शासकीय
आयटीआयचे एन.आर. सोनुने उपस्थित होते.
वेरुळ ता. खुलताबाद येथील केंद्र विश्वकर्मा मंदीर, वेरूळ
ता.खुलताबाद येथे आहे. तेथेच उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय
करण्यात आली होती. सरपंच कुसुमबाई प्रकाश पाटील, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य
विकास केंद्राचे सागर औटे, कौशल्य विकास विभागाचे रामदास फुले, शासकीय आयटीआयचे पी.एम.
जोगदंड उपस्थित होते.
अजिंठा ता.
सिल्लोड येथील केंद्र राममंदीर हॉल, अजिंठा ता.सिल्लोड येथे असून तेथेच उद्घाटन
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती. सरपंच नजिर शेख,
प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे योगेश पद्मवंशी, कौशल्य विकास
विभागाचे विरेंद्र चव्हाण, शासकीय आयटीआयचे अरविंद गायधर उपस्थित होते.
घाटनांद्रा ता.
सिल्लोड येथील केंद्र नॅशनल हायस्कूल समोर, बस स्टॅण्ड जवळ, घाटनांद्रा ता.सिल्लोड
येथे असून उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय ग्रामपंचायत सभागृहात
करण्याट आली होती. सरपंच यासिन तडवी, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास
केंद्राचे बाळासाहेब जाधव, कौशल्य विकास विभागाचे विरेंद्र चव्हाण, शासकीय
आयटीआयचे एस.एस. पाटील उपस्थित होते.
फर्दापूर ता.
सोयगाव येथील केंद्रावर उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय जि.प.
हायस्कूल येथे करण्यात आली होती. सरपंच शकिलाबी शेख हुसेन, प्रधानमंत्री उद्योजकता
कौशल्य विकास केंद्राचे सागर सोनवणे, कौशल्य विकास विभागाचे गजानन खोकड, शासकीय
आयटीआयचे पंडीत म्हस्के उपस्थित होते.
गोंदेगाव ता. सोयगाव येथील केंद्र वालठाण रोद,
गोंदेगाव येथे असून तेथेच उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात
आली होती. सरपंच विजय नगरे, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे
रावसाहेब चोपडे, कौशल्य विकास विभागाचे गजानन खोकड , शासकीय आयटीआयचे एस. व्ही.
भोसले उपस्थित होते.
शिवूर ता.
वैजापूर संत
बहिणाबाई कन्या प्रशाला शिऊर , ता.वैजापूर येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास
केंद्र ऑनलाईन उदघाटन कार्यक्रम पार पडला.या वेळी सरपंच राजश्री जाधव, माजी उद्योग
संचालक महाराष्ट्र राज्य जे जे जाधव साहेब, भाजप मा. एकनाथ जाधव , मा.जी.प सदस्य
सुनीलदादा पैठणपगारे , अण्णासाहेब पाटील महामंडळ चे विभागीय समन्वयक प्रविण आगवान
पाटील, गट निदेशक बी डी. वाणी,सौ. एम एस जोशी मॅडम, ग्रामसेवक दिवटे सर, नारायण
काटे, अमोल जाधव, अरुण गोरे , नारायण पवार, योगेश शेळके, राधाकिसन साळुंखे, तलाठी
कोळेकर सर , बचतगट जयश्री ढमाले हे उपस्थित होते.
लासूरगाव ता.
वैजापूर येथील केंद्र जि.प.हायस्कूल समोर. लासुर स्टेशन रोड येथे असून जि.प.
हायस्कूल येथे उद्घाटन सोहळ्याचे थेट
प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती. सरपंच नंदा वसंतराव हुमे, प्रधानमंत्री
उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे तुषार साळूंखे, कौशल्य विकास विभागाचे रामदास
फुले , शासकीय आयटीआयचे बी.एम. जाधव उपस्थित होते.
०००००







.jpg)
Comments
Post a Comment