सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दर्जेदार सेवा द्या- अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे

 




छत्रपती संभाजीनगर, दि.3 (जिमाका) – ग्राहकांना आगामी सणांच्या कालावधीत मिळणाऱ्या विविध सेवा योग्य व दर्जेदार मिळाव्यात यासाठी सर्व सेवा देणाऱ्या विभागांनी खबरदारी घ्यावी,असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांनी आज दिले.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, जिल्हापुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पी.व्ही.बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.एल.दिवटे, जिल्हा आरोग्य विभाग डॉ.जी.एल.कुडबीकर, उपनियंत्रक नियत्रंक वैधमापन शास्त्र विभाग उपनियंत्रक आर.डी.दराडे, अन्न व औषध प्रशासन विभाग सहायक आयुक्त डी.व्ही.पाटील, अन्न निरीक्षक जी.डी.जाधव, जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी दिलीप निकम, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य राजेश मेहता, नानक वेदी, धनंजय मुळे, विजय चौधरी, श्रीमती जयश्री एकबोटे, अन्वर अली, अमोल चतुर, श्रीमती संगीता धारुकर, ॲड. सिद्दीकी अझीझ आदी उपस्थित होते.

बैठकीत अशासकीय सदस्यांनी विविध मुद्दे मांडले. त्यात प्रामुख्याने उघड्यावर व अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांस प्रतिबंध, नवरात्रोत्सवात कर्णपूरा यात्रेनिमित्त पार्कींग दराचा फलक दर्शनी भागात लावणे, शिवभोजन केंद्र, मध्यान्ह भोजन योजनेद्वारे मिळणारे अन्न हे गरजूंना वेळेत उपलब्ध व्हावे, मिठाई व खाद्यपदार्थ बनविणारे व विक्री करणारे यांच्याकडील अन्नपदार्थ मालाच्या दर्जाची तपासणी व्हावी, याबाबत चर्चा करण्यात आली. आगामी सणासुदीचा कालावधी पाहता ही तपासणीची  कारवाई अधिक गतिमान  करावी,असे निर्देश डॉ. लोखंडे यांनी दिले.  तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात प्रतिबंधित औषधांची विक्री होत असेल तर अश्या मेडिकल स्टोअर विरुद्ध धडक मोहिम राबवावी,असेही त्यांनी सांगितले. महावितरण कंपनीने वीज वितरण सेवा अधिक सुलभतेने द्यावी. वीज ग्राहकांनी महावितरणच्या सेवांबाबत काहीही अडचण असल्यास 1800 212 3435, 1800 233 3435, 1912, 19120 या टोल फ्री क्रमांकावर वर संपर्क साधावा,अशी माहिती बैठकीत देण्यात आली.  शासकीय विभागांनीही   ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा गतिने करण्यावर भर द्यावा,असेही डॉ. लोखंडे यांनी निर्देश दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा