नेत्र रुग्णालयाची रिक्त इमारत शासकीय कॅन्सर रुग्णालयास हस्तांतरीत; जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची कार्यवाही

 



छत्रपती संभाजीनगर, दि.5(जिमाका)- कॅन्सर रुग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी  जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारीतील शासकीय नेत्र रुग्णालयाची रिक्त झालेली  इमारत तातडीने शासकीय कॅन्सर रुग्णालयास हस्तांतरीत करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

येथील आमखास मैदान समोरील जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) चे नेत्र रुग्णालय दुसरीकडे हलवण्यात आले आहे. तथापि, ही रिकामी इमारत शासकीय कॅन्सर रुग्णालयाला देण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी निर्गमित केले होते. त्यास विलंब न करता रुग्णांची सोय करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज सायंकाळी नेत्र रुग्णालयाच्या रिकाम्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. ही रिकामी इमारत शासकीय कॅन्सर रुग्णालयाच्या शेजारी असल्याने कॅन्सर रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तातडीने कॅन्सर रुग्णालयाच्या ताब्यात देण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे, तहसिलदार विजय चव्हाण,कॅन्सर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अरविंद गायकवाड, सिव्हिल सर्जन डॉ.दयानंद मोतीपवळे, मंडळ अधिकारी कल्याण वानखडे आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा