मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर,दि.9(जिमाका)- सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग यांची सर्व कार्यालये व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, तसेच खासगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांनी आपल्याकडील मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र दि.30 पूर्वी ऑनलाईन सादर करावे,असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, तसेच खासगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 माहे सप्टेंबर 2023 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत (30 ऑक्टोंबर 2023 पर्यंत) सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांनी सप्टेंबर – 2023 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 दि.30 ऑक्टोंबर 2023 पर्यत सादर करावे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन एम्प्लॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्‌यांचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ई-आर रिपोर्ट मधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लीक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्टया वगळून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 0240-2954859 या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करावा.

 सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदी वरील प्रमाणे सर्व आस्थपनांनी 30 सप्टेंबर 2023 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ई-आर 1 विवरणपत्र 30 ऑक्टोंबर 2023 पूर्वी वरील वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, असे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा