साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने मागविली शेतजमिनींची माहिती
छत्रपती संभाजीनगर,दि.१८(जिमाका):- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील लोकांकडून त्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीची माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून मागविण्यात आली आहे. येत्या दि.३१ ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, शिवाजी हायस्कूलच्या बाजूला, छत्रपती संभाजीनगर येथे कागदत्रांसह अर्ज सादर करावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे- शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो.
Comments
Post a Comment