विविध आरोग्य योजनांचा आढावा: दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी समन्वयाने काम करावे- डॉ. विकास मीना

 





छत्रपती संभाजीनगर,दि.१७(जिमाका):- गरोदर माता, शालेय विद्यार्थी, सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम, सुरक्षित मातृत्व, मुलींचा जन्मदर वृद्धी अशा विविध उद्दिष्टांसाठी शासन विविध आरोग्य योजना यंत्रणांमार्फत राबवित असते, अशा योजनांची अंमलबजावणी समन्वयाने करावी व नागरिकांणा दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्या,असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाअंतर्गत विविध योजना व उपक्रम राबवले जातात .एड्स नियंत्रण कार्यक्रम ,कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम ,प्रधानमंत्री मातृवंदना योजना,  सूरक्षित मातृत्व अश्वासित (सुमन) कार्यक्रम बाबत जिल्हास्तरावरील  कार्यवाही  आढावा या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे यांच्यासह सर्व प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक, तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित उपस्थित होते.   

एड्स नियंत्रण कार्यक्रम

सुरुवातीला एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जोखीम क्षेत्रातील वाहनचालक, स्थलांतरित कामगार यांच्या बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना,सुरक्षा साधनांचा वापर आणि उपलब्धता याबाबत सामाजिक संस्थांना माहिती देण्यात आली. आरोग्य समुपदेशन व उपचार याबाबत माहिती देण्यात आली.  हे करीत असताना गोपनियतेचा भंग होणार नाही  यापद्धतीने नियंत्रण कार्यक्रम राबवावा, असे अपर जिल्हाधिकारी डॉ लोखंडे यांनी सांगितले. एचआयव्ही बाधितांना इतर योजनेचा लाभ मिळत नसेल तर किमान संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तसेच त्यांच्या प्रमाणपत्राची  नोंद घेणे, माहितीचे संकलन करावे व येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. त्यामध्ये रेशन दुकानदाराच्या मार्फत त्यांनाही धान्य वाटप करण्यात यावे असे यावेळी सांगण्यात आले.       

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गटप्रवर्तक अशा, नर्स आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरून तपासणी करावी . गावनिहाय संशयित रुग्ण तपासणी करून औषधोपचार आणि प्रतिबंध कारवाई करण्यासाठी आरोग्य यंत्राने समन्वयाने काम करावेत.  सर्व तालुक्यातही उद्दिष्टे पूर्तीचे काम  नियोजन करून  करावे असे सूचित केले.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना

ही केंद्र शासनाची योजना असून यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यामध्ये १ लाख २१ हजार महिलांना लाभ दिला असून यामध्ये पहिल्या अपत्याच्या वेळी पाच हजार रुपये व दुसऱ्या अपत्याच्या वेळी मुलगी अपत्य असेल तर सहा हजार रुपये लाभ देण्यात येतो अशी माहिती देण्यात आली. या योजनेचा समन्वय महिला बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे मातृ वंदना योजनेचे पुढील कामकाज जिल्हास्तरावर महिला बालकल्याण विभागाने करावे, असे निर्देश डॉ. मीना यांनी दिले. गरोदर आणि स्तनदा मातांना वेळेत लाभ मिळवून देण्याबाबत उद्दिष्टांपेक्षा जास्त काम केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.   

सुरक्षित मातृत्व आश्वासित कार्यक्रम (सुमन)

या कार्यक्रमांतर्गत महिलांना सुरक्षित मातृत्व प्रदान करण्यासाठी ‘सुमन’ कार्यक्रम राबवला जातो. गरोदर मातांना सुविधा व प्रतिसादात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. या सुविधेचा जास्तीत जास्त महिलांच्या सुरक्षित आणि स्वच्छ प्रसूतीसाठी करण्यात यावा असे डॉ. मीना यांनी सांगितले.

पीसीपीएनडीटी कार्यक्रम

मुलीचा जन्मदर वाढावा ,गर्भ लिंगनिदान  चाचणी प्रतिबंधया कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी धडक मोहीम राबवावी.  गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग, व स्थानिक माहिती स्त्रोताचा, अशासेवक आरोग्य, विभाग यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

तंबाखू मुक्त शाळा आणि तंबाखू मुक्त परिसर तयार करुन त्यांचे काटेकोर पालन करावे. शिक्षणसंस्था, शासकीय कार्यालय, रुग्णालय,मॉल, बाजाराच्या व अन्य सार्वजनिक ठिकाणी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी,असे निर्देश डॉ. मीना यांनी दिले.

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा