ग्रामपंचायत निवडणूक २०२३ :नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी सायं. साडेपाच पर्यंत वेळ वाढवली
छत्रपती संभाजीनगर,दि.१७(जिमाका):- राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात दि.१६ ते दि.२० दरम्यान नामनिर्देशन पत्र सादर केले जात आहेत. ही प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पार पाडली जात आहे. तथापि, नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र भरतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. तथापि, दि.१८ ते दि.२० या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी तीन ऐवजी सायंकाळी साडेपाच पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
००००००
Comments
Post a Comment