प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांचे गुरुवारी (दि.१९) प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन; जिल्ह्यातील १७ केंद्रांचा समावेश

 छत्रपती संभाजीनगर,दि.१७(जिमाका):- राज्यातील ग्रामीण भागातील युवकांकरीता ग्रामपंचायत स्तरावर ५११ प्रधानमंत्री उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. गुरुवार दि.१९ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. जिल्ह्यातील १७ केंद्रांचा यात समावेश असून इच्छुकांना प्रशिक्षणासाठी नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री उद्योजकता विकास केंद्रांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण १७ गावांची निवड करण्यात आली आहे. गावांची नावे याप्रमाणे- छत्रपती संभाजीनगर- वडगाव कोल्हाटी, गंगापूर- रांजणगाव शेनपुंजी, हर्सूल सावंगी, कन्नड- पिशोर, देवगाव रंगारी, पैठण-बिडकीन, विहामांडवा, फुलंब्री- वडोदबाजार, गणोरी,  खुलताबाद- वेरुळ, सिल्लोड- अजंठा, घाटनांद्रा, सोयगाव- फर्दापूर, गोंदेगाव, वैजापूर- शिवूर, लासुरगाव.

कौशल्य विकास प्रशिक्षण

प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांमध्ये जनरल ड्युटी असिस्टंट, फ्लेबोटोमिस्ट, फिटर, फॅब्रिकेशन, मल्टी स्किल टेक्निशियन (इलेक्ट्रीकल), ग्राफिक डिझायनर, फिल्ड टेक्निशियन, इतर घरगुती उपकरणे, दुचाकी सेवा तंत्रज्ञ, डेअरी शेतकरी, उद्योजक, सोलर पीव्ही इंस्ट्रॉलर(सूर्यमित्र), डेटा एन्ट्री ऑपरेटर,  सुरक्षा रक्षक इ. रोजगार/ स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

संस्थांमार्फत राबविणार प्रशिक्षण

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई कार्यालयामार्फत स्वारस्याची अभिव्यक्ती (EOI) प्रक्रिया पूर्ण करुन गठीत समितीमार्फत तीन संस्थामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जाणार आहे. त्या संस्था याप्रमाणे-  छत्रपती संभाजीनगर, गंगापूर या तालुक्यांमधील गावांकरीता उज्वलयोग इंडिया ओपीसी प्रा. लि. (संपर्क व्यक्ती- योगेश धोत्रे, मोबाईल क्रमांक ९८६०१०५६१७), कन्नड, पैठण आणि फुलंब्री या तालुक्यांमधील गावांकरीता श्री राजुरेश्वर गणेश बहुउद्देशीय संस्था (संपर्क व्यक्ती- नरेंद्र अमृतकर, मोबाईल क्रमांअक ८४१२९९५७५७) आणि खुलताबाद, सिल्लोड सोयगाव व वैजापूर तालुक्यांमधील गावांकरीता युवा विकास सोसायटी (संपर्क व्यक्ती- रामेश्वर मोरे, मोबाईल क्रमांक ९०२१७२९३७२)

ग्रामिण भागातील १८ ते ४५ वयोगटातील इच्छुक युवक युवतींनी या प्रशिक्षणासाठी आपला सहभाग नोंदवावा. गुरुवार दि.१९ रोजी दुपारी ४ वा. जवळच्या प्रशिक्षण स्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर सुरेश वराडे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा