राज्य सेवा हक्क आयुक्तांची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयास भेट

 



औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) – आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग, छत्रपती संभाजीनगर डॉ. किरण जाधव, यांनी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयास भेट दिली.

 यावेळी राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर विभाग व नांदेड विभाग यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत पुरविण्यात येणा या 52 सर्वांचा आढावा घेण्यात आला. राज्य सेवा हक्क आयोगाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामकाजाचे सादरीकरण संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजीनगर यांनी केले. या 52 सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये विहीत कालमर्यादेत पुरविणे बंधनकारक असून सदर सेवा विहीत कालमर्यादत न पुरविल्यास प्रथम व द्वितीय अपिलाची तरतूद असल्याने याबाबत डॉ.किरण जाधव आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग यांनी नियमातील तरतुदीबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बैठकीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, प्रदीप पवार, व उषा वर्मा, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, लातुर, हिंगोली व विभागातील सर्व उप अधीक्षक, निरीक्षक व दुय्यम निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित असलेल्या छत्रपती संभाजीनगर विभागीय उप विभाग व नांदेड विभागातील सर्व अधिका-यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा विहीत कालमर्यादत देण्यात येत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा