आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,दि.10 (जिमाका)- केंद्रीय शिक्षण, मंत्रालय, शालेय शिक्षण
आणि साक्षरता विभागाच्या वतीने सन 2023-24 वर्षासाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल
घटकासाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन
पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
सन 2023-24 वर्षासाठी राष्ट्रीय आर्थिक
दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMSSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती
पोर्टल (NSP 2.0) (www.scholarship.gov.in)
वर नवीन आणि नुतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यास दि.1 ऑक्टोंबर पासून
सुरुवात झाली आहे. त्यासाठी अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2023 आहे. राज्यामध्ये
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत NMSSS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022-23
मध्ये निवड झालेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी, 2023-24 शैक्षणिक वर्षाची
इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जंदार म्हणून आणि
9 वी, 10 वी, 11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्तीधारकांनी स्वत:ची नोंदणी आधार
नुसार करावी लागेल. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक
वर्ष 2023-24 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नुतनीकरण अर्जदार म्हणून स्वत:चे
नुतनीकरण करावे लागेल.
तर केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तीचे
सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) द्वारे दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता 9 वी आणि 10 वी) शिष्यवृत्ती
लागू केली आहे. NSP 2.0 पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी दि. 01 आक्टोंबर 2023
पासून सुरु झाली आहे. या योजनेचे तपशील या विभागाच्या वेबसाइटवर (www.depwd.gov.in) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती
पोर्टल (www.scholarship.gov.in) वर
उपलब्ध आहेत. नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पोर्टलवर दि. 30
नोव्हेंबर 2023 आहे.
पात्रतेचे निकषः-
पालकाचे उत्पन्न रु.3,50,000/- पेक्षा
जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे.
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित (टप्पा अनुदान सह) शाळेतील
विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय
तसेच केंद्र, राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खासगी
विनाअनुदानित शाळेतील, खासगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांने
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.
इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधरण (जनरल)विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिक गुण
(अनुसुचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांस 5 टक्के सुट) इयत्ता 9 वी मधून 10 वी
मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र
विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्यांच्या नावाचेच खाते असावे.
विद्यार्थी ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी
अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी प्री – मॅट्रिक शिष्यवृत्ती पात्रतेचे निकष
अनुदानित शाळांतील इयत्ता 9 वी व 10 वी च्या दिव्यांग
विद्यार्थ्यांना (CwDs) प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. अर्जदार विद्यार्थ्याचे
दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के किंवा जास्त असावे. सक्षम अधिकाऱ्याचे
दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र हे Rights of Persons with Disabilties Act 2016
मध्ये निकषांनुसार असावे. एकाच पाल्यांच्या 2 पेक्षा अधिक अक्षम (दिव्यांग)
पाल्यांना हि शिष्यवृत्ती लागू नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना
शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच
लागू राहील. विद्यार्थ्यांने इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता
येणार नाही.विद्यार्थी नियमित असावा. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त
शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्यांने त्याच्या सोयीनुसार लाभाची लाभदायी
शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करवून
घ्यावी. मात्र विद्यार्थी निवास, निवासासाठी देय अनुदान किंवा अशा प्रकाराची
राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडून पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य
खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारु शकतात. शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा
राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही
शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील. पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून
प्राप्त वार्षिक उत्पन्न रु 25 हजार पेक्षा जास्त नसावे.
शिष्यवृत्ती रक्कम
NMSSS साठी वार्षिक 12 हजार रुपये
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती वार्षिक 9 हजार ते 14 हजार 600 रुपये.
वेळापत्रक NMSSS व प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी
ऑनलाईन अर्ज सादर करणे सुरुवात 1 ऑक्टोंबर 2023, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30
नोव्हेंबर 2023, शाळासतर अर्ज पडताळणी अंतिम तारीख 15 डिसेंबर 2023, जिल्हा स्तर
अर्ज पडताळणी अंतिम तारीख 30 डिसेंबर 2023 दोन्ही योजनांसाठी पात्र लाभर्थांनी
विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment