प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.6 (जिमाका)- शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी  National Apprenticeship Mela (PMNAM) प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आय.टी.आय.पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिं.9 ऑक्टोंबर 2023 रोजी मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक आस्थपना उपस्थित राहणार आहे. सदर मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार डी.डी.वानखेडे मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा