दौलताबाद किल्ला ते वेरुळ लेणी वाहतूक मार्गात रविवारी(दि.26) बदल
छत्रपती संभाजीनगर, दि.21(जिमाका):- दौलताबाद किल्ला ते वेरुळ लेणी या दरम्यान रविवार दि.26 रोजी औरंगाबाद ब्लॅक बक्स समूहा तर्फे मॅरेथॉन रन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या मॅरेथॉन स्पर्धेच्या कालावधीत (पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा) छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय हद्दीतील दौलताबाद टी पॉईंट ते वेरुळ लेणी मार्गावरील वाहतुक बंद ठेवून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे,तसे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी निर्गमित केले आहेत.
आदेशात म्हटल्यानुसार, मॅरेथॉन स्पर्धा ही दौलताबाद ते वेरुळ लेणी
या रोडवर असून रविवार दि.26 रोजी पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा वा. पर्यंत
छत्रपती संभाजीनगर ते वेरुळ मार्गावरील वेरुळ लेणी ते कागजीपूरा पोलीस
आयुक्तालयातील हद्दीपर्यंतचा रस्ता सर्व प्रकाराच्या वाहनांसाठी बंद राहील. या
कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तो या प्रमाणे-
छत्रपती संभाजीनगर – दौलताबाद मार्गे वेरुळ लेणी जाणारी
वाहने छत्रपती संभाजीनगर – दैलताबाद टी पाँईन्ट (शरनापुर) कसाबखेडा-वेरुळ मार्गे
जातील.
वेरुळ – खुलताबाद – दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर
कडे येणारी वाहतूक वेरुळ – कसाबखेडा – माळीवाडा – दौलताबाद टि पाँईन्ट मार्गे-
छत्रपती संभाजीनगर कडे येईल.
फुलंब्री - खुलताबाद – वेरुळ जाणारी वाहतुक फुलंब्री –
छत्रपती संभाजीनगर- नगरनाका – दौलताबाद टि पाँईन्ट- कसाबखेडा मार्गे वेरुळला जाईल.
वेरुळ- खुलताबाद- फुलंब्री जाणारी वाहतूक वेरुळ-
कसाबखेडा – दौलताबाद टि पाँईन्ट छत्रपती संभाजीनगर मार्गे फुलंब्री कडे जाईल.
छत्रपती संभाजीनगर- दौलताबाद – खुलताबद जाणारी वाहतुक छत्रपती
संभाजीनगर – फुलंब्री मार्गे खुलताबाद जाईल.
खुलताबाद- दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी
वाहतुकखुलताबाद – फुलंब्री मार्गे छत्रपती संभाजीनगर ला जाईल.
00000
Comments
Post a Comment