जिल्ह्यात गुरुवार (दि.३०) पासून पशुवंध्यत्व निवारण शिबीरे

 


        छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका):- जिल्ह्यात गुरुवार दि.३० पासून पशुवंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि.१९ डिसेंबर पर्यंत ही शिबीरे जिल्ह्यात मोहिम स्वरुपात राबविण्यात येणाड़ आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.डी. झोड यांनी दिली आहे.

भाकड व वंध्यत्व पशुधनावर उपचार करुन ते उत्पादनात आणता यावे यासाठी दि.३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत पशुवंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका, लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय यांच्या कार्यक्षेत्रात हे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी भाकड जनावरांना उपचार करुन उत्पादनात आणण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी दिले आहेत. या पशुवंध्यत्व निवारण शिबिरात पशुपालकांनी आपल्या गुरांवर उपचार करुन घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा