दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-२०२३;आज (शनिवार दि.१८): नऊ परीक्षा केंद्र;३०९६ उमेदवार; ३८८ कर्मचारी
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दि.१८ रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी नऊ परीक्षा केंद्रांवर ३०९६ उमेदवारांची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३८८अधिकारी- कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.
परीक्षा केंद्रनिहाय
उमेदवार संख्या याप्रमाणे-
१. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
कला व वाणिज्य, नागसेनवन-३१२,
२. मिलिंद महाविद्यालय विज्ञान, नागसेनवन- ३१२,
३. सरस्वती भूवन महाविद्यालय विज्ञान औरंगपुरा- २८८
४. सरस्वती भूवन मुलांची शाळा,औरंगपुरा- ३८४,
५. सरस्वती भूवन महाविद्यालय आर्टस व कॉमर्स- ४३२,
६. शिवाजी हायस्कूल, खोकडपुरा-२४०
७. मौलाना आझाद महाविद्यालय आर्टस, विज्ञान आणि वाणिज्य, रोजा बाग
पार्ट - I -३१२,
८. मौलाना आझाद महाविद्यालय आर्टस, विज्ञान आणि वाणिज्य, रोजा बाग
पार्ट -II-४५६,
९. शासकीय महाविद्यालय, कला व विज्ञान सुभेदार विश्रामगृहजवळ विश्वास
नगर-३६०.
अशा एकूण ३०९६ परीक्षार्थींच्या परीक्षेची
व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ३८८ अधिकारी कर्मचारी
नियुक्त करण्यात आले आहेत.
परीक्षार्थींसाठी
सुचनाः-
परीक्षार्थींनी परीक्षेस येतांना ओळखीचा पुरावा (स्वतःचे आधार
कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्टकार्ड प्रकारचे
ड्रायव्हींग लायसन्स यापैकी कोणतेही एक) परीक्षा कक्षात उमेदवारास प्रवेश
प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉलपेन, ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकीत प्रत या
व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही. तसेच
डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लू टूथ, कॅमेरा फोन अन्य तत्सम संदेशवाहक
उपकरण, इलेक्र्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे,असेही
उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.
०००००

Comments
Post a Comment