वाळू डेपो लिलाव प्रक्रियेत लिलावधारकांनी सहभाग घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
छत्रपती
संभाजीनगर,दि. 2 (जिमाका) – शासन निर्णय दि. 19 एप्रिल
2023 रोजीच्या सर्वकष वाळू धोरणानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यावरण अनुमतीस
अधिन राहून वाळूगटातून वाळू उत्खन्न व उत्खन्न केलेल्या बांधकाम योग्य वाळूची वाळू
डेपोपर्यंत वाहतूक,डेपो निर्मिती, व्यवस्थापन व विक्री करणेकरीता ई-निविदा अधिसूचना
(प्रथम फेरी) दि. 01 नोव्हेंबर 2023 रोजी प् प्रसिद्ध करण्यात आली आहे. डागपिंपळगाव
ता.वैजापूर येथे वाळू डेपो निश्चित केलेले आहे. जिल्ह्यात एकूण 13 वाळू घाटासाठी 6
वाळू डेपो निश्चित केले आहेत. वाळू डेपो निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त लिलावधारक
यांनी सहभाग घ्यावा असे जिल्हा प्रशासनातर्फे
आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील मौजे
निमखेडा वाळु घाटासाठी गेवराई गुंगी ता.फुलंब्री येथे वाळू डेपो, पैठण तालुक्यातील
मौजे नांदर भाग-1, 2,3, नवगांव भाग-2, ब्रम्हगाव वाळु घाटासाठी ब्रम्हगाव वाळु घाटासाठी
ब्रम्हगाव ता.पैठण येथे वाळू डेपो, सिल्लोड तालुक्यातील मौजे सावखेडा बु.वाळु घाटासाठी
बोरगाव बाजार ता.सिल्लोड येथे वाळू डेपो, सिल्लोड तालुक्यातील मौजे धानोरा वाळु घाटासाठी
मोढा खु.ता.सिल्लोड वाळू डेपो, सिल्लोड तालुक्यातील मौजे बोरगाव कासारी वाळु घाटासाठी
बोरगाव कासारी ता.सिल्लोड येथे वाळू डेपो, वैजापूर तालुक्यातील मौजे पुरणगाव, भालगाव,
अव्वलगाव व नागमठाण वाळु घाटासाठी डागपिंपळगाव ता.वैजापूर येथे वाळू डेपो निश्चित केलेले
आहे. जिल्ह्यात एकूण 13 वाळू घाटासाठी 6 वाळू डेपो निश्चित केलेले असून सदर वाळू घाटातून
70968 ब्रास (320121 मेट्रीक टन) वाळू उपलब्ध होणार आहे.
ई-निविदेच्या संपूर्ण अटी व शर्ती जिल्हाधिकारी छत्रपती
संभाजीनगर यांचे https://aurangabad.nic.in
व https://mahatenders.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत आली आहे.
ई निविदेचे फॉर्म दि. 01 नोव्हेंबर 2023 ते 15 नोव्हेंबर
2023 या https://mahatenders.gov.in या लिलावधारक यांचे साठी उपलब्ध असून दिनांक 15 नोव्हेंबर
2023 दुपारी 4 वाजेपर्यंत लिलावधारक निविदा भरु शकतील.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळू डेपो निविदा प्रक्रियेत
जास्तीत जास्त लिलावधारक यांनी सहभाग घ्यावा असे जिल्हा प्रशासनातर्फे जाहिर आवाहन
करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment