पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना;अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,दि.९(जिमाका)- पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने (संकेतस्थळ व मोबाईल ॲपद्वारे) अर्ज करावा. त्यासाठी दि.९ डिसेंबर पर्यंत मुदत आहे,असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.डी. झोड यांनी कळविले आहे.
समाविष्ट योजना
या
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण
योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, शेळी-मेंढी
गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य
देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गटवाटप इ. साठी सन २०२३-२४ मध्ये ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड
प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यासाठीही अर्ज करता
येणार आहे.
पाच वर्षांपर्यंत प्रतिक्षा यादी लागू
लाभार्थी
निवडीची ही प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी गेली चार वर्ष ऑनलाईन पद्धतीने
अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरु करण्यात आली आहे. हीच पद्धत सन २०२१-२२
पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी लागू करण्यात आली आहे. एखाद्या योजनेकरीता अर्ज
केल्यानंतर अर्जदारास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली
प्रतिक्षा यादी सन २०२१-२२ पासून पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत सुरु
ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता
वाढली आहे. शिवाय प्रतिक्षा यादीतील त्यांच्या क्रमांकानुसार केव्हा लाभ मिळेल हे सुद्धा
कळू शकते. त्यामुळे लाभार्थी
हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरीता नियोजन करणे शक्य होते.
संकेतस्थळ व मोबाईल ॲपद्वारे अर्ज करण्याची
सुविधा
पशुपालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com
, ॲण्ड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशन AH.MAHABMS (Google प्ले स्टोअरवर उपलब्ध) वर नाव नोंदवावे.
योजनेची संपूर्ण माहिती,अर्ज करण्याची पद्धती याबाबत संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच
मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत. या प्रणालीत
अर्ज भरणे अत्यंत सुलभ असुन, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल. तसेच बहुतांशी
माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता
स्वत:च्या मोबाईलचा वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर
अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक
बदलू नये. मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.अर्ज
दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत करता येणार आहे.
अधिक
माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००२३३०४१८ किंवा तालुक्याचे पशुधन विकास
अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय,
तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क
साधावा, असे आवाहन पुशसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
०००००

Comments
Post a Comment