साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; २९ रोजी मेळावा

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रचारासाठी बुधवार दि.२९ रोजी  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूल शेजारी, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर  येथे बुधवार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे.  अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे महासंचालक सुनिल वारे हे राहणार असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांची माहिती करुन घेण्यासाठी उपस्थित रहावे,असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक किसन पवार यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा