जिल्हा पुरस्कारासाठी लघु उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर,दि.३ (जिमाका)-  राज्य शासनातर्फे  उत्कृष्ट लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत  उत्कृष्ट लघु उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उत्तम रहावा, स्पर्धात्मक वातावरण निर्मितीच्या दृष्टिने हे पुरस्कार राज्य शासनामार्फत दिले जातात.  त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना www.di.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरुन दि.३० नोव्हेंबर पूर्वी  जिल्हा उद्योग केंद्र, स्टेशन रोड, वेदांत नगर, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावा.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

अर्ज हा फोटो सहित विहित नमुन्यात असावा.अर्जासोबत उद्यम नोंदणी प्रमाणपत्र, मागील पाच वर्षातील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन व वर्षनिहाय झालेला नफा, तीन फोटो, मागील तीन वर्षाचे ताळेबंद व नफातोटा पत्रक, कर्जखाते नियमित असल्याबाबत संबंधित बॅंकेचे पत्र सादर करावे. सन २०२२ साठी १ जानेवारी २०२ च्या आधी स्थायी लघु उद्योग नोंदणीकृत/ उद्यम नोंदणीकृत व गेल्या दोन वर्षांपासून सलग उत्पादनात आहेत,असे लघु उद्योग घटक या पुरस्कारासाठी पात्र असईल. घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

पुरस्काराचे स्वरुप

प्रथम पुरस्कार शाल, श्रीफळ व १५ हजार रुपये. द्वितीय पुरस्कार शाल, श्रीफळ व १० हजार रुपये.

पात्र लघु उद्योजकांनी अर्ज करावे,असे आवाहन  महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा