प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना; पारंपारिक व्यवसाय प्रशिक्षकांकडून अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर,दि.९(जिमाका)- केंद्र शासनाने देशातील हस्तकारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये १८ व्यवसायांचा (ट्रेड) समावेश केला असून या विविध १८ व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्सची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आली आहे.
निवड झालेले मास्टर
ट्रेनर ज्या दिवशी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देतील त्या प्रत्येक दिवसासाठी
मानधन व प्रवास भत्ता राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरण (NSDC) मार्फत अदा करण्यात
येईल. जिल्ह्यातील जेष्ठ व साधारणत: २० वर्षे अनुभव असलेल्या मास्टर ट्रेनर्सनी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर
कार्यालयात आवश्यक माहिती व कागदपत्रे शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर पर्यंत सादर करावीत,
असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त
एस.आर.वराडे यांनी केले आहे.
समाविष्ट पारंपारिक व्यवसाय- बांधकाम करणे, शिवणकाम,
सुतारकाम, केशकर्तन, लोहारकाम, चपला शिवणे, बुट बनविणे,मातीची भांडी बनविणे, मूर्तीकार,शिळा
कारागीर, कपडे धुलाई- इस्त्री, सोनारकाम, अवजार बनविणे, टोपली, चटई बनविणे,
माळाकार, खेळणी बनविणे, जाळे बनविणे, बोट बनविणे इ.
०००००


Comments
Post a Comment