विशेष अर्थसहाय्य योजना;लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,दि.९(जिमाका)- विशेष अर्थसहाय्य योजना (संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना इ.) लाभार्थ्यांसाठी अनुदान प्रदान करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसेल त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र सादर करावे,असे आवाहन तहसिलदार संगायो शहरविभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
शहर
विभागासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १ कोटी ५७ लाख ७८ हजार १०० रुपये इतके
अनुदान वाटप झाले आहे. तसेच श्रावणबाळ निराधार
योजनेअंतर्गत १ कोटी ६० लाख ७१ हजार ५०० रुपये अनुदान वाटप झाले आहे. तथापि, ज्या
लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसेल त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र तहसिलदार संगायो शहर विभाग, छत्रपती संभाजीनगर
येथे सादर करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००

Comments
Post a Comment