४४ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन १० व ११ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर,दि.१३ (जिमाका):-  सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्याने यांच्या वतीने शनिवार दि.१० व रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी  ४४ व्या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन व उद्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत व प्रदर्शनात  अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन सहायक संचालक जे. व्ही. चौगुले यांनी केले आहे.

या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शनात  गुलाबपुष्पे फुलदानातून, मोसमी फुले, बहुवार्षिय फुले,  कॅक्टस व सकुलंट, कुंड्यातील शोभिवंत झाडे, लॅण्डस्केप ऑन द स्पॉट, कलात्मक पुष्परचना, उद्यान स्पर्धा इ. विभाग आहेत. प्रत्येक विभागातील विजेत्यास एक चषक,  पुष्पप्रदर्शनात  सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या स्पर्धकास उपवने व उद्याने विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी पुर्सकृत केलेला फिरता चषक प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेतील व सर्व गटांकरता वेगवेगळि परितोषिके ठेवण्यात आली आहेत.  तसेच पुष्परचना, पुष्प रांगोळि या विभागासाठीही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.  त्या अनुषंगाने स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धांनी आपल्या उद्यानांची, फुलझाडांची निग राखून आपली उद्याने नीटनेटकी ठेवावीत. या स्पर्धेत व प्रदर्शनात  अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन सहायक संचालक जे. व्ही. चौगुले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी  ८६९८०७०८८२ व ९१७२५५९७९८वर संपर्क साधावा,असेही कळविण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा