जागतिक एड्स दिन; रॅलीतून जनजागृती
छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- जागतिक एड्स दिनानिमित्ताने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा यांच्या वतीने एचआयव्ही, एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीस क्रांती चौक येथुन सुरुवात झाली. सहायक उपसंचालक (प्रभारी) आरोग्य सेवा
डॉ.पी.एम.कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पद्मजा सराफ व जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ.धानोरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रांरभ करण्यात आला.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सावरगावंकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.मनीषा
भोंडवे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील पाटील, जिल्हा रुग्णालय नर्सिंग कॉलेज पडेंगाव
प्राचार्य डॉ.देशमुख उपस्थित होते. तसेच श्रीमती साधना गंगावणे, जिल्हा कार्यक्रम
अधिकारी संजय पवार, जिल्हा पर्यवेक्षक विनोद मस्के, अंकुश राठोड, जोती वाडेकर
विविध महाविद्यालयाचे एनएसएस समन्वयक आदी मान्यवर उपस्थित होते.
या जनजागृती रॅलीत स्व.सै. उत्तमराव पाटील नर्सिंग कॉलेज, आरोग्य व
कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, मदर टेरेसा नर्सिंग कॉलेज, जिल्हा रुग्णालय
नर्सिंग कॉलेज, माणिक नर्सिंग कॉलेज, एमआयटी नर्सिंग कॉलेज, कमलनयन बजाज नर्सिंग
कॉलेज, शिवा ट्रस्ट नर्सिंग कॉलेज, डॉ.डी.एम.एफ.टी.स्कुल नर्सिंग कॉलेज, समाज
कार्य महाविद्यालय, डॉ.बा.आं.म.वि.मौलाना आझाद कॉलेज, डॉ.रफिक झकेरिया कॉलेज,
मिलिंद महाविद्यालय, एमपी लॉ कॉलेज, वसंतराव नाईक कॉलेज, सर सय्यद महाविद्यालय,
शिवछत्रपती कॉलेज, एन.सी.सी.विद्यार्थी तसेच एड्स नियंत्रणासाठी कार्य
करणाऱ्या सर्व अशासकीय संस्थानी सहभाग नोंदविला. डॉ.संकपाळ, बाबा हिंदुस्थानी, मदन
बिमरुट कलामंच व मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज (एमजीएम) या विद्यार्थ्यांनी पथनाट्य व
कलापथकापासून एचआयव्ही, एड्स आजारा विषयी उपस्थितांना माहिती दिली.
रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा एड्स
प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालय येथील श्रीमती साधना गंगावणे, जिल्हा
कार्यक्रम अधिकारी जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार, सुनिल नवले, अनिरुद्ध काळे, संदीप
तायडे, अंकुश राठोड (साथी), कविता पवार (ओटीएस एआरटी) सुनिल उगले, अन्नपुर्णा
ढोरे, बळीराम ढेरे, सुनिता नवाते, अनिल काळे, सुरेश लोखंडे, सुनिल माने तसेच
रुग्णालय येथील कर्मचारी व आयसीटीसी समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मराएनिसो
अनुदानित अशासकीय संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
०००००
Comments
Post a Comment