प्रत्येक आस्थापना/कार्यालयात अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी-अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांचे निर्देश


 छत्रपती संभाजीनगर,दि.८(जिमाका):-  जिल्ह्यातील प्रत्येक आस्थापना, कार्यालयात महिलांची अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी,असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी आज येथे दिले.

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३ नुसार जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबत शासन निर्णय आहे. त्याअंतर्गत महिला तक्रार निवारण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

 अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे म्हणाले की, ज्या कार्यालयामध्ये दहा किंवा दहापेक्षा अधिक महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रत्येक कार्यालय, आस्थापना यांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करावी. या समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावा. या अधिनियमानुसार प्रत्येक स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, सहकारी संस्था, खाजगी संस्था, सोसायटी, शैक्षणिक संस्था, मॉल, खाजगी कंपनी, महाविद्यालय, विद्यापीठ व इतर सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे बंधनकारक आहे. या समितीकडे प्राप्त तक्रारींचा वार्षिक अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणे ही बंधनकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक आस्थापनेने/ कार्यालयाने स्थापन केलेल्या समितीची  तसेच अंमलबजावणीची अद्यावत माहिती विहित नमुन्यात जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे ईमेलद्वारे दि.१५ डिसेंबर पर्यंत पाठवावी, असे आवाहन यावेळी जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा