ईव्हीएम,व्ही.व्ही.पॅट यंत्राबाबत जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबवा- जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

 छत्रपती संभाजीनगर,दि.८(जिमाका):-लोकांमध्ये ईव्हीएम व व्ही व्ही पॅटच्या वापराविषयी जनजागृती करावी यासाठी निवडणूक आयोगातर्फे जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम राबवितांना नियमावलीचे  काटेकोरपणे पालन करा. निवडणूक कर्मचाऱ्यांना परिपूर्ण प्रशिक्षित करुन मोहीम यशस्वीपणे  राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात आज ईव्हीएम व व्ही व्ही पॅट जनजागृती मोहीम यशस्वी राबविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी,सह निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार निवडणूक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले की, निवडणूक आयोगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार प्रशासन  कामाला लागले आहे. निवडणूक आयोगाने तंत्रज्ञान वापरून अमुलाग्र बदल केले आहेत. त्याअनुषंगाने ईव्हीएम व  व्ही व्ही पॅटच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे .जनजागृती मोहिमेत नागरिकांच्या शंकांचे समाधान करावयाचे आहे,असेही त्यांनी सांगितले. यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा