एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धा परीक्षा २५ फेब्रुवारी रोजी
छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):- इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पर्धा परीक्षा होणार आहे. त्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी, ६वी, ७ वी व ८ वी त शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरुन घेऊन ते मुख्याध्यापकांनी दि.१७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रकल्प कार्यालयात सादर करावे,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर चे प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.
या स्पर्धा परीक्षेसाठी
अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमतरावती यांच्या अधिनस्त प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद,
कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रातील १२ जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित
आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच
सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात
इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी व ८ वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या
स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील. सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी प्रवेश
परीक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावे. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित
शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प यांचेकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज दि.१७ फेब्रुवारी २०२४
पर्यंत संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांनी सादर करावे, असे एकत्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर चे प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी कळविले
आहे.
०००००
Comments
Post a Comment