युवा महोत्सवात प्रश्नमंजूषा स्पर्धा

 


छत्रपती संभाजीनगर,दि.१३ (जिमाका):-  जिल्हा एडस प्रतिबंधक व नियंत्रण पथकाच्या वतीने इयत्ता ८ वी , ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा आज एमजीएम क्लोव्हर डेल स्कूल येथे आयोजित करण्यात आली.  या स्पर्धेत स्वरा चित्तेवाड हिने प्रथम क्रमांक, वेदिका शेवणकर द्वितीय, तर शर्वरी मुंढे तृतीय क्रमांक मिळवून विजेते ठरले.  या स्पर्धेसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे,  जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार, समन्वयक अंकुश राठोड, संदीप तायडे, प्राचार्य गणेश तराटे ,श्रीमती आशा कांबळे आदी उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा