जिल्ह्यात १ लाख ५५ हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली विकसित भारत संकल्प यात्रा : सर्वसामान्यांना लाभ देण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करावे- डॉ.भागवत कराड

 








     छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, ही विविध योजनांची माहिती घेऊन गावागावांत पोहोचत आहे. आतापर्यंत ही यात्रा जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ५८८ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. अजून किमान महिनाभर ही यात्रा जिल्ह्यात असून या उर्वरित कालावधीत सर्व समाज घटकांतील सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे,असे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज येथे दिले.

विकसित भारत संकल्प यात्रेतील उपक्रमांचा आज आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामावत तसेच अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख ११ हजार ९७० लोकांनी यात्रेला भेट दिली. या दरम्यान ५४३१ सुरक्षा बीमा खाते, ४३८२ जीवनज्योती विमा खाते, १५ हजार ६०८ लोकांची आरोग्य तपासणी असे अनेक योजनांचे लाभ देण्यात आले. याशिवाय ५६६ जणांनी ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ या अंतर्गत शासकीय योजनांचे लाभार्थी म्हणून अनुभव कथन केले आहे. शहरी भागात ४८ हजार ६१८ लोकांनी आपला सहभाग नोंदविला असून  ३१०३ जणांची आधार कार्ड नोंदणी व अद्यावतीकरण, ८८५९ जणांची आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्डसाठी ५२९५ नोंदणी, प्रधानमंत्री स्वनिधीसाठी ६३२८ जणांची नोंदणी अशा विविध योजनांच्या लाभासाठी  लोकांपर्यंत ही संकल्प यात्रा पोहोचली आहे.

डॉ. कराड म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेची कामगिरी चांगली आहे. संपूर्ण राज्यात आपल्या जिल्ह्यात ती सर्वोत्तम असावी यासाठी गोरगरीब सामान्य जनतेला अधिकाधिक योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी हा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. कराड यांनी प्रधानमंत्री आवास योजना, शिधा पत्रिका, आपले सरकार सेवा केंद्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान क्रेडीट कार्ड योजना, आयुष्मान भारत कार्ड, गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अशा विविध योजनांचा आढावा घेतला. या संदर्भात अधिकाधिक माहिती लोकांना मिळावी. जागेवरच नोंदणी सुविधा असावी असे निर्देशही डॉ. कराड यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा