माविमतर्फे दि.१५ ते १७ बचतगटांच्या उत्पादनांचा प्रदर्शन व विक्री महोत्सव
छत्रपती संभाजीनगर,दि.१३ (जिमाका):- महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दि.१५ ते १७ दरम्यान करण्यात आले आहे. बळवंत वाचनालय, औरंगपुरा येथे हे प्रदर्शन होणार आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवार दि.१५ रोजी दुपारी १ वा.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, विभागीय साधन व्यक्ती विलास बच्चे हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात शनिवार दि.१६ रोजी बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांचे
आजची स्त्री व सायबर गुन्हे या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानास जिल्हा
नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रदीप झोड, सहा. आयुकत कौशल्य विकास
सुरेश वराडे उपस्थित राहणार आहेत. तसेच रविवार दि.१७ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
पी.आर. देशमुख, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे
प्रकल्प संचालक अशोक सिरसे, सहाय्यक आयुक्त मनपा अशोक कायंदे, नाबार्ड जिल्हा विकास
प्रबंधक सुरेश पटवेकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड व लोकसंचालित साधन केंद्रांचे सर्व अध्यक्षांनी केले
आहे.
००००००

Comments
Post a Comment